घरमहाराष्ट्र...तर चार तारखेपासून ऐकणार नाही, दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लागणार, राज ठाकरेंचा...

…तर चार तारखेपासून ऐकणार नाही, दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लागणार, राज ठाकरेंचा इशारा

Subscribe

चार तारखेपासून ऐकणार नाही. जिथे जिथे यांचे लाऊडस्पीकर लागतील तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लागलीच पाहिजे. लाऊडस्पीकर तुमच्या धर्मात बसत नसल्याचंही राज ठाकरेंनी अधोरेखित केलं.

औरंगाबादः लाऊडस्पीकरचा विषय यापूर्वी अनेकांनी काढला आहे. मी फक्त त्याला पर्याय दिला आहे. लाऊडस्पीकर लावून गोंगाट करणार असाल तर मशिदीबाहेर मोठ्यानं दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचा निर्धारच राज ठाकरेंनी बोलून दाखवला.

रस्त्यावर येऊन नमाज पढताय, तुम्हाला कोणी अधिकार दिले, आज तारीख एक आहे, उद्या तारीख दोन आहे. तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणांमध्ये मला कोणतंही विष कालवायचं नाही. चार तारखेपासून ऐकणार नाही. जिथे जिथे यांचे लाऊडस्पीकर लागतील तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लागलीच पाहिजे. लाऊडस्पीकर तुमच्या धर्मात बसत नसल्याचंही राज ठाकरेंनी अधोरेखित केलं.

- Advertisement -

लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे धार्मिक नाही. आणि जर धार्मिक विषय करणार असाल तर तसंच आम्हाला उत्तर द्यावं लागेल. महाराष्ट्राची शांतता आम्हाला भंग करायची नाही. उत्तर प्रदेशमध्ये लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात, तर महाराष्ट्रात का नाही. सगळे लाऊडस्पीकर हे अनधिकृत आहेत. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेल्यानुसार किती जणांकडे परवानगी आहे. संभाजीनगरमध्ये 600 मशिदीवर लाऊडस्पीकर आहेत. प्रत्येक वेळेला आम्हीच का सहन करायचं, इथे जणू काही भोंग्याची स्पर्धाच लागलीय, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावलाय.

शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच एलर्जी

शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच एलर्जी आहे. शरद पवार प्रत्येक वेळी भाषणात बोलताना शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेतात. महाराष्ट्र हा शाहू, फुले आणि आंबेडकरांचा आहेच. पण त्याआधी महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर हे शिवाजी महाराजांचाच विचार घेऊन पुढे गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत शिवाजी महाराजांचा फोटो नसतो. आता मी बोलल्यानंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर छत्रपतींची प्रतिमा दिसायला लागली. मी जात मानत नाही. मला जातीशी देणेघेणे नाही. मी याठिकाणी ब्राह्मणांची बाजू घेण्यासाठी उभा नाही, असंही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

- Advertisement -

फक्त ब्राह्मण म्हणून बाबासाहेब पुरंदरेंना पवारांनी वृद्धपकाळात त्रास दिला

ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या घराघरात पोहोचवले. त्या आमच्या बाबासाहेब पुरंदरेंना शरद पवारांनी त्यांच्या वृद्धापकाळात त्रास दिला. पवारांनी जातीच्या दृष्टीने नेहमी माणसांना बघितलं. आमच्या घराण्यात जातीपातीला थारा नाही. आम्हाला जातीपातीचं देणंघेणं नाही. मी जात बघून एखाद्याकडे जात नाही, जात बघून पुस्तक वाचत नाही, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने जातीयवाद वाढला. जेम्स लेन प्रकरण पवारांनी तापविण्याचा प्रयत्न केला. जर त्याच्याविरोधात एवढाच जर रोष होता, तर केंद्रात तुमचं सरकार सत्तेत होतं, त्यावेळी त्याला खेचून का आणलं नाही?, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.


हेही वाचाः आता मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांत सभा होणार, राज ठाकरेंचा एल्गार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -