पंतप्रधान मोदी अधिर रंजन चौधरींवर भडकले; म्हणाले, ‘मला तुम्ही असे करण्यास भाग पाडले’

पंतप्रधान मोदी अधिर रंजन चौधरींवर भडकले; म्हणाले, ‘मला तुम्ही असे करण्यास भाग पाडले’

पंतप्रधान मोदी अधिर रंजन चौधरींवर भडकले; म्हणाले, 'मला तुम्ही असे करण्यास भाग पाडले'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत भाषण केले. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत काँग्रेस नेते अधिर रंजन यांच्यावर भडकले आणि म्हणाले, ‘तुम्ही सदनाच्या मर्यादा राखल्या नाहीत, त्यामुळे मला उत्तर देण्यास भाग पाडले.’

नक्की काय घडले?

आज लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सरकारने केलेले काम सांगण्यास सुरुवात केली. पण यादरम्यान अधिर रंजन यांनी मध्येमध्ये बोलण्यास सुरुवात केली. यावेळेस एकदा पंतप्रधान मोदी खाली बसले, परंतु लोकसभा स्पीकरच्या आदेशानंतर पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. पण काँग्रेस नेते रंजन मानण्यास तयार नव्हते आणि ते सतत मध्येमध्ये बोलू लागले. हे पाहता पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचा इतिहास सांगण्यास सुरुवात केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘नागालँडने २४ वर्षांपूर्वी काँग्रेसला मत दिले होते, २७ वर्षांपूर्वी ओडिसाने तुम्हाला मत दिले होते. तसेच २८ वर्षांपूर्वी गोव्यात पूर्ण बहुमताने तुम्ही जिंकला होता. १९९८मध्ये त्रिपुराने काँग्रेसला मत केले होते. तसेच पश्चिम बंगालने १९७२मध्ये काँग्रेसला मत दिले होते. तुम्ही तेलंगणाचे निर्माण श्रेय घेतला, परंतु जनतेने तुम्हाला स्वीकारले नाही.’

पंतप्रधान मोदींनी हे आकडे सांगताच पुन्हा एका काँग्रेस नेते उभे झाले आणि मध्येमध्ये बोलू लागले. ज्यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मी सदनाची मर्यादा पाळतो, परंतु तुम्ही मर्यादा पाळत नाहीत. ज्यामुळे मला सदनामध्ये उत्तर देण्यासाठी भाग पाडले.’


हेही वाचा – देशभरात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल


 

First Published on: February 7, 2022 7:27 PM
Exit mobile version