नवे शैक्षणिक धोरण २१ व्या शतकातील भारताचा पाया बनेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवे शैक्षणिक धोरण २१ व्या शतकातील भारताचा पाया बनेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय शिक्षण धोरणेवर विचार मांडत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान संवाद साधत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भविष्याचा विचार करुनच नवे शिक्षण धोरण तयार करण्यात आले आहे. नव्या भारताच्या पायाभरणीसाठी नवे शिक्षण धोरण उपयुक्त आहे. प्रत्येक देश आपले ध्येय लक्षात ठेव बदल करत पुढे जात असते. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामागे हाच विचार आहे. आज देशभरात नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होत आहे. वेगवेगळ्या विचारांचे लोक आपले मत मांडत आहे. शिक्षण धोरणावर मंथन करत आहेत. यावर जितकी जास्त चर्चा होईल तितका शिक्षण व्यवस्थेला फायदा होणार आहे. देशातील कोणत्याही क्षेत्र, वर्गाकडून यामध्ये एकतर्फी निर्णय असल्याची टीका झालेली नाही. लोक वर्षांपासून सुरु असलेल्या शिक्षण धोरणात बदल अपेक्षित करत होते आणि तो पहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे – 

हेही वाचा –

Sushant Sucide Case : रियाची मागणी ED ने फेटाळणी; चौकशी आजच होणार

First Published on: August 7, 2020 11:11 AM
Exit mobile version