दिवसभरात एकदाच जेवतात मोदी; खुद्द पंतप्रधानांनीच सांगितले यामागचे कारण

दिवसभरात एकदाच जेवतात मोदी; खुद्द पंतप्रधानांनीच सांगितले यामागचे कारण

दिवसभरात एकदाच जेवतात मोदी; खुद्द पंतप्रधानांनीच सांगितले यामागचे कारण

आजकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण दिवसात एकच वेळ जेवत आहेत, अशी हैराण करणारी माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असे का करतात? याचा खुलासा त्यांनी स्वतः केला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलेल्या खेळाडूंना त्यांच्या निवासस्थान जेवणासाठी बोलावले होते. त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी दिवसभरात ते एकच वेळ का जेवतात, याबाबत सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी टोकिया ऑलिम्पिकमध्ये मेडल विजेत्या खेळाडूंसोबत झालेल्या भोजन कार्यक्रमात सुवर्ण पद जिंकून इतिहास रचणार भालाफेकपटू नीरज चोप्राला आवडणारा चुरमा खायला दिला. त्यावेळेस पंतप्रधानांनी नीरज चोप्राला चुरमा देऊ केला तेव्हा नीरजला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘एकदा माझ्यासोबत चूरमा खावा लागेल.’ मग नीरज चोप्रा याने पंतप्रधानांना चूरमा खाण्यासाठी सांगितले, तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘आता चातुर्मास आहे आणि याकाळात मी एकच वेळ जेवतो.’

सध्या चातुर्मास सुरू आहे. हा प्रामुख्याने जैन धर्मातील लोकं पाळतात. तसेच चातुर्मासात हिंदू देखील धार्मिक विधी करतात. यादरम्यान दही, पालेभाज्या सारख्या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत. शिवाय हवामानाचा विचार करून दिवसभरात एकच वेळ जेवले जाते.

इतरांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा चातुर्मास पाळतात आणि दिवसभरात एकच वेळ जेवतात. याचा संपूर्ण खुलासा या कार्यक्रमाच्या व्हिडिओतून झाला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दिवसभरात एकच वेळ का जेवतात हे सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी चातुर्मास व्यतिरिक्त नवरात्रीमधील उपवास देखील पकडतात. नवरात्री दरम्यान मोदी दुर्गा देवीची पूजा करतात.


हेही वाचा – Haiti earthquake: हैतीच्या भूकंपातला मृत्यूमुखींचा आकडा २,२००वर


 

First Published on: August 19, 2021 4:42 PM
Exit mobile version