घरताज्या घडामोडीHaiti earthquake: हैतीच्या भूकंपातला मृत्यूमुखींचा आकडा २,२००वर

Haiti earthquake: हैतीच्या भूकंपातला मृत्यूमुखींचा आकडा २,२००वर

Subscribe

हैतीतील भूकंपामुळे मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत आहे. हैती झालेल्या भीषण भूकंपातील मृत्यूचा आकडा २ हजार २००वर पोहोचला आहे. कॅरेबियन बेटावरील हैतीच्या नागरी संरक्षण संस्थेने सांगितले की, हैतीमध्ये १४ ऑगस्टला झालेल्या ७.२ रिश्टर स्केलच्या भीषण भूकंपातील मृत्यूची संख्या वाढली असून ती २ हजार १८९ झाली आहे. आतापर्यंत या भूकंपामुळे १२ हजारांहून अधिक लोकं जखमी झाले आहेत. सध्या हैतीत बचावकार्य सुरू आहे. वृत्तसंस्था सिन्हुआच्या माहितीनुसार, प्रदेशानुसार मृत्यूचे विश्लेषणात असे आढळले की, दक्षिण हैतीमध्ये १ हजार ८३२ मृत्यूंची संख्या झाली आहे.

हैतीमध्ये सर्वात तीव्रेचा भूकंप झाला होता. यामुळेच आतापर्यंत २ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून हजारांहून अधिक लोकं जखमी झाले आहेत. तसेच हैदीमधील घरं आणि इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हैतीमधील अधिकाऱ्यांनी मंगळवारी भूकंपात ५००हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. दरम्यान पाऊस असल्यामुळे हैदीमध्ये बचाव कार्यात अडथळा येत आहे.

- Advertisement -

यापूर्वीही हैदीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. २०१८ साली ५.९ तीव्रतेचा भूकंप हैदीमध्ये आला होता. त्यामध्ये १२ हून अधिक लोकं मृत्यूमुखी पडले होते. तसेच २०१० साली ७.१ तीव्रतेचा भीषण भूकंपात २ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच देशाच्या पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.


हेही वाचा – काबुल विमानतळावर अफगाणि मातांचा आक्रोश, तारेच्या कुंपणावरून मुलांची फेकाफेक, अनेक बालके जखमी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -