स्पिकर असतानाही मोदींनी नागरिकांशी माईक न घेता साधला थेट संवाद, कारण…

स्पिकर असतानाही मोदींनी नागरिकांशी माईक न घेता साधला थेट संवाद, कारण…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या दौऱ्यावर असताना सभेमध्ये स्पिकर असतानाही माईक घेऊन भाषण करणं टाळलं. शिवाय, नरेंद्र मोदींनी गुडघे टेकून सभेसाठी उपस्थित असलेल्या नागरिकांची माफीही मागितली. परंतु, मोदींनी अचानक असे केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र, आपल्याला लाऊडस्पीकर संबंधीच्या नियमाचे पालन करायचे आहे, असे सांगत मोदींनी सभेला संबोधित करण्यास नकार देत उपस्थितांची माफी मागितली. (Pm Narendra Modi Skipped Using A Microphone Apologizes In Rajasthan Rally)

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या दौऱ्यावर असून रात्री अबू रोड परिसरात सभेला संबोधित करण्यासाठी ते पोहोचले होते. मात्र या ठिकाणी पोहोचण्यास नरेंद्र मोदींना उशीर झाला. यामुळे नरेंद्र मोदींनी मायक्रोफोन वापरत सभेला संबोधित करण्यास नकार दिला. नरेंद्र मोदी यांनी माईकचा वापर न करताच तेथील उपस्थितांशी संवाद साधल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नरेंद्र मोदी आपण संबोधित करु शकत नसल्याने माफी मागत आहेत. तसेच, आपण पुन्हा एकदा सिरोहीला येऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.

मोदी पण म्हणतात ‘मी पुन्हा येईन’

“येथे पोहोचण्यास मला उशीर झाला. मी नियमांचे पालन केले पाहिजे असे मला वाटते. त्यामुळे मी तुम्हा सर्वांची माफी मागत आहे. मी तुम्हाला आश्वासन देतो की, मी पुन्हा येईल. तुम्ही दिलेले प्रेम आणि आपुलकीची नक्की परतफेड करेन”, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.


हेही वाचा – दोन भारतीय मच्छीमार नौका पाकिस्तानच्या ताब्यात; अटक केलेल्या 16 खलाशांमध्ये 7 जण पालघरमधील

First Published on: October 1, 2022 11:14 AM
Exit mobile version