Punjab Election 2022: चन्नी म्हणे, यूपीच्या भैयांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका, आता पंतप्रधान म्हणतात…

Punjab Election 2022: चन्नी म्हणे, यूपीच्या भैयांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका, आता पंतप्रधान म्हणतात…

Punjab Election 2022: चन्नी म्हणे, यूपीच्या भैयांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका, आता पंतप्रधान म्हणतात...

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानापुर्वी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. परप्रांतीयांच्या विषयावर वाद निर्माण झाला आहे. या वादामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेनेही उडी घेतली आहे. तिसऱ्या टप्प्यात पंजाबमध्ये विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या जनतेला आणि मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात येत आहे. परंतु या घोषणांमुळेच पक्षांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी प्रचारादरम्यान असच एक वक्तव्य केलंय त्यामुळे पंजाबमध्ये परप्रांतीयांवरुन वाद निर्माण झाला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी प्रचार करत आहेत. यावेळी त्यांच्या बाजूलाच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीसुद्धा उपस्थित आहेत. एकजूट व्हा आणि यूपी बिहार आणि दिल्लीच्या भईयांना पंजाबमध्ये घुसून देऊ नये, ते इथे राज्य करण्याचा प्रयत्न करताय असे वक्तव्य मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी केलं आहे. चन्नींच्या या वक्तव्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा चन्नींना फटकारले आहे. असे वक्तव्य करुन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंजाबवासियांना मतदानासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न आता काँग्रेसवर भारी पडताना दिसत आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की पंजाबमध्ये यूपी-बिहारचे लाखो लोक राहतात, जे छोट्या-छोट्या नोकऱ्यांद्वारे राज्याचे आर्थिक स्वास्थ्य राखण्यात योगदान देतात, परंतु आता राजकीय फायद्यासाठी त्यांचा गैरवापर करणे योग्य आहे, असे प्रश्न प्रत्येकजण विचारत आहे.

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले की, “मंचवरून पंजाब, यूपी, बिहारचे मुख्यमंत्री लोकांचा अपमान करतात आणि प्रियांका वाड्रा त्यांच्या शेजारी उभ्या राहून हसत आहेत, टाळ्या वाजवत आहेत. अशा प्रकारे काँग्रेस उत्तर प्रदेश आणि देशाचा विकास करणार? लोकांना आपापसात भांडायला लावून?

पंतप्रधानांनी चन्नीेना फटकारले 

पंतप्रधान म्हणाले, ‘काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले वक्तव्य. त्यांचे दिल्लीतील मालक उभे राहून टाळ्या वाजवत होते. हे लोक त्यांच्या वक्तव्याने कोणाचा अपमान करत आहेत? इथले असे एकही गाव नसेल, जिथे उत्तर प्रदेश आणि बिहारचे आमचे बंधू-भगिनी कष्ट करत नाहीत. आपण कालच संत रविदास यांची जयंती साजरी केली. मला या नेत्यांना विचारायचे आहे की, संत रविदास यांचा जन्म कुठे झाला? संत रविदास यांचा जन्म काशी, उत्तर प्रदेश येथे झाला. उत्तर प्रदेशातील बांधवांना आत येऊ देणार नाही, असे तुम्ही म्हणता. मग संत रविदास यांचे नावही पुसणार का? तुम्ही कोणती भाषा बोलता? असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेंदींचा हल्लाबोल

प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केले आहे की, “राजकीय पक्षांनी यूपी आणि बिहारच्या लोकांना अपयशी ठरविले आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे पर्याय आहे ते पळून जातात. जसे भारतीयांना परदेशात जायचे असते. त्यानंतरची सरकारे त्यांना संधी आणि नोकऱ्या देण्यास असमर्थ आहेत, परंतु जेव्हा ते इतर राज्यात असतात तेव्हा ते त्यांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात. स्वस्त मजूर हे तुमचे सेवा देणारे आहेत, ते तुमचे व्यापारी, उद्योजक, आमदार आणि नोकरशहा आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो भारतीय आहे. त्यांची चेष्टा करणे थांबवा.”

चन्नींकडून वक्तव्यावर घुमजाव

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात येत आहे. पंजाबमध्ये आलेल्या कामगारांनी राज्याच्या विकासासाठी काम केले असल्याचे चन्नी म्हणाले आहेत. आमच्या मनात त्यांच्या विषयी प्रेम आहे आणि ते कोणीही बदलू शकणार नाही असेही चन्नींनी म्हटलं आहे.

प्रियंका गांधींकडूनही स्पष्टीकरण

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात येत आहे. पंजाबमधील सरकार हे फक्त पंजाबींद्वारेच चालवण्यात येईल असे त्यांना बोलायचे होते परंतु त्यांच्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात येत आहे. तसेच मला वाटत नाही कोणाला युपीवरुन पंजाबमध्ये राज्य करण्याची इच्छा असेल. दरम्यान विरोधकांनाही प्रियंका गांधी यांनी चांगलेच फटकारले आहे. पंतप्रधान मोदींनी युपीच्या लोकांवर आणि शेतकऱ्यांवर अन्याच केला आहे. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना चिरडण्यात आले त्यावेळी मोदी युपीला भेट द्यायला आले नाही. परंतु आता निवडणुका आल्यामुळे ते युपीला भेट देत आहेत. महागाई आणि बेरोजगारी सध्या वाढली आहे. त्यावर मोदी बोलत नाहीत असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला आहे.


हेही वाचा : Nitin Gadkari : लवकरच हवेत बस उडताना दिसणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

First Published on: February 17, 2022 8:11 PM
Exit mobile version