पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला २५ लाख चौकीदारांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला २५ लाख चौकीदारांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘मैं भी चौकीदार’ या मोहिमे अंतर्गत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ लाख चौकीदारांशी ऑडिओरूपात संवाद साधला. यावेळी त्यांनी सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे चौकीदारांना चोर म्हटले गेल्यामुळे त्यांची माफीही मागितली. देशातील कामगारांचा अपमान करणे ही नामदारांची सवय असल्याची टीका त्यांनी यावेळी विरोधकांवर केली.

हा ऑडिओरूपी संवाद साधताना मोदी म्हणाले, टीव्ही असो किंवा सोशलमिडीया, भारत असो किंवा विदेश आज प्रत्येक भारतीय ‘मै भी चौकीदार’ असं म्हणत आहे. जगभरातील सगळ्या भाषेतील लोकांना हा शब्द कळू लागला आहे, आणि त्यांनी तो मनापासून स्विकारला आहे. गेल्या काही दिवसांपासून सगळे याचीच चर्चा करत आहेत.

मी तुम्हा लोकांची माफी मागतो. कारण मागील काही महिन्यांपासून काही लोक आपल्या वैयक्तिक हितांसाठी चौकीदारांविरोधात चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. या लोकांच्या भाषेमुळे तुमच्या भावनेला दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. हे खूप दुर्दैवी आहे.

दरम्यान, मोदींनी अनेकवेळा स्वत:ला देशाचा रखवालदार, प्रधानसेवक आणि दक्ष चौकीदार म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलच्या नावापुढे चौकीदार असे नाव केल्यामुळे विरोधकांनी चौकीदारही चोर है असा प्रचार सुरू केला आहे.

First Published on: March 20, 2019 8:12 PM
Exit mobile version