हल्ल्यावेळी मोदी स्वत: अॅक्शन रुममध्ये होते हजर

हल्ल्यावेळी मोदी स्वत: अॅक्शन रुममध्ये होते हजर

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय हवाई दलाने मंगळवारी सकाळी साडे तीन वाजेच्या सुमारास एलओसीमध्ये घुसून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. हा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निगराणीखाली झाला आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. वायू दलाच्या या कारवाई दरम्यान नरेंद्र मोदी स्वत: अॅक्शन रुममध्ये हजर होते.

जैश ए मोहम्मदचे तीन कंट्रोल उद्धवस्त

भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईत जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रुम पूर्णपणे उद्धवस्त झाली. पहाटे साडे तीनच्या सुमारास भारतीय वायूसेनेचे मिराज २००० या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळे उद्धवस्त केले आहेत. या कारवाईसाठी भारतीय वायूसेनेचे १२ मिराज २००० हे लढाऊ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरले होते. या लढाऊ विमानांमार्फत भारतीय वायूसेनेने १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब दहशतवादी तळ्यांवर फेकले. त्यामुळे दहशतवादी तळे पुर्णपणे उद्धवस्त झाली. यामध्ये जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रुम पूर्णपणे उद्धवस्त झाली.

या हल्ल्यामध्ये मसूदचे दोन भाऊ ठार

या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मद संघटनेचे २०० ते ३०० दहशतवादी मारले गेले आहेत. त्याचबरोबर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचे दोन भाऊ या हल्ल्यामध्ये मारले गेले आहेत. मसूदच्या मोठ्या भावाचे नाव इब्राहिम अझहर तर दुसरा मौलान तल्हा अझहर असे आहे. त्याचबरोबर मसूदचा मेहुणा युसूफ अझहरही मारला गेला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.


हेही वाचा – तुम्ही झोपा काढत होता का?; पाकिस्तानी जनतेचा वायूसेनेला सवाल

First Published on: February 26, 2019 4:14 PM
Exit mobile version