1 ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार शुभारंभ

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट सेवेला सुरूवात होणार आहे. यामुळे भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने आज ट्वीट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताचे डिजिटल परिवर्तन आणि कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर नेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आशियातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान प्रदर्शन इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये भारतात 5G सेवेला सुरूवात करतील.

5Gमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 दरम्यान 36.4 ट्रिलियन रुपये फायदा होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला होता. त्यावेळी केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु होईल अशी माहिती दिली होती. त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यापासून भारतामध्ये 5G इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे.

5G सेवेचा काय फायदा होईल?

5G सेवेमध्ये डेटा पाठवणे आणि प्राप्त करण्याचा वेग पूर्वीपेक्षा अधिक वेगवान होणार आहे. यामुळे लोकांचा वेळ तर वाचेलच, पण नव्या युगातील अनेक अॅप्लिकेशन्सही सहज वापरता येतील. 5G च्या मदतीने, ग्राहकांचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला होईल आणि आता व्यवहारापासून ते फाइल्स डाउनलोड किंवा अपलोड करण्यासाठी कमी कालावधी लागेल. 5G दूरसंचार सेवांद्वारे, उच्च दर्जाचे व्हिडीओ किंवा चित्रपट काही सेकंदात मोबाइल आणि इतर उपकरणांवर डाउनलोड केले जाऊ शकतात.


हेही वाचा : पीएफआयच्या निशाण्यावर होते पंतप्रधान नरेंद्र मोदी, ईडीचा दावा


 

First Published on: September 24, 2022 3:20 PM
Exit mobile version