Russia Ukraine War: झेलेंस्की यांच्यानंतर पंतप्रधान मोदींची 50 मिनिटे पुतिन यांच्यासोबत बातचीत; युक्रेनच्या परिस्थितीवर चर्चा

Russia Ukraine War: झेलेंस्की यांच्यानंतर पंतप्रधान मोदींची 50 मिनिटे पुतिन यांच्यासोबत बातचीत; युक्रेनच्या परिस्थितीवर चर्चा

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत बातचीत केली. मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये 50 मिनिटे चर्चा झाली. युक्रेनच्या सध्याच्या परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. राष्ट्रपती पुतिन यांनी युक्रेन आणि रशियन टीममधील चर्चेच्या स्थितीबाबत मोदींना माहिती दिली.

झेलेंस्कींसोबत बातचीत करण्याची केली विनंती

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत बातचीत करताना पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना झेलेंस्की यांच्यासोबत बातचीत करण्याची विनंती केली. तसेच सुमीसह युक्रेनच्या काही भागांमध्ये युद्धबंदीची घोषणा आणि मानवतावादी कॉरिडॉर तयार करण्याच्या हालचालींचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. शिवाय सुमीहून भारतीय नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित काढण्यावर मोदींनी जोर दिला. राष्ट्रपती पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना भारतीय नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी सहकार्य करून असे आश्वासन दिले.

यापूर्वी सोमवारी पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्कींसोबत फोनवर बातचीत केली होती. माहितीनुसार, झेलेंस्की आणि मोदींमध्ये ३५ मिनिटांपर्यंत बातचीत झाली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा केली. यादरम्यान मोदींनी झेलेंस्कींचे कौतुकही केले. तसेच भारतीय नागरिकांची सुटकेसाठी युक्रेन सरकारने सहाकार्य केल्याबद्दल झेलेंस्कींचे आभार मानले.

दरम्यान रशियाने २४ फेब्रुवारीपासून युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली. आज रशिया-युक्रेनच्या युद्धाचा बारावा दिवस आहे. यादरम्यानच मोदी यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींसोबत बातचीत केली. आतापर्यंत रशियाने युक्रेनची बरीच शहरे उद्ध्वस्त केली आहेत. यादरम्यान युक्रेनच्या लाखो लोकांनी दुसऱ्या देशात आश्रय घेतला आहे.


हेही वाचा – Russia-Ukraine War : इरपिनमधील नागरिकांवर रशियन सैन्याचा गोळीबार, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा


 

First Published on: March 7, 2022 4:43 PM
Exit mobile version