घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War : इरपिनमधील नागरिकांवर रशियन सैन्याचा गोळीबार, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा

Russia-Ukraine War : इरपिनमधील नागरिकांवर रशियन सैन्याचा गोळीबार, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा

Subscribe

किव्ह:  रशियन सैन्याने युक्रेन बंदर शहर ओडेसा येथे बॉम्बफेक करण्याची तयारी केली आहे, असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमेर झेलेन्स्की यांनी रविवारी केला. रशियन सैन्याने विनित्सावर क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याची माहिती झेलेन्स्की यांनी दिली. या हल्ल्यात विनित्सा विमानतळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. याशिवाय किव्हमध्ये येणार्‍या इरपिनमधील नागरिकांवर रशियन सैन्याने गोळीबार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
रशियाने युक्रेनमधील दोन शहरांपुरती युद्धबंदी जाहीर केली असली, तरी मारिउपोल शहराभोवती वेढा घालून असलेल्या रशियन फौजा युद्धबंदीचे पालन करत नसल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.

दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताच्या दूतावासाने बुडापेस्ट, हंगेरी येथे एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत रविवारी २१३५ भारतीयांना युक्रेनच्या शेजारील देशांमधून ११ विशेष विमानांद्वारे परत आणण्यात आले आहे. यासह, २२ फेब्रुवारी रोजी विशेष उड्डाणे सुरू झाल्यापासून १५,९०० हून अधिक भारतीयांना परत आणण्यात आले आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली.

- Advertisement -

इस्रायलच्या पंतप्रधानांची झेलेन्स्कींशी चर्चा

इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमेर झेलेन्स्की यांच्याशी युद्धात मध्यस्थी करण्यासंदर्भात चर्चा केल्याचे कळत आहे. या दोन्ही नेत्यांमधील गेल्या काही दिवसांतील ही तिसरी चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -