प्रियंका चतुर्वेदींना धमकी देणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

प्रियंका चतुर्वेदींना धमकी देणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी

काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांना सोशल मीडियावरुन धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथे आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. गिरीश महेश्र्वरी असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीने ट्विटरवरुन प्रियंका चतुर्वेदी यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती.

प्रियंका चतुर्वेदी यांना २ जुलैला गिरीश महेश्र्वरी याने ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने प्रियंका यांच्या १० वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी प्रियंका चतुर्वेदी यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी गृहमंत्रालयाने आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. पोलिसांनी तपासामध्ये वेग आणत आरोपी गिरीशला अहमदाबाद येथून अटक केली. आरोपीविरोधात मानसिक छळ करणे, धमकी देणे, सोशल मीडियाचा गैरवापर करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट करुन सांगितले आहे की, “भगवान रामच्या नावाने ट्विटर हॅडल चालवून पहिले तर माझे चूकीचे विधान लावतो, त्यानंतर माझ्या मुलीबद्दल अभद्र ट्विट करतो. थोडी लाज असेल तर ओंजळभर पाण्यामध्ये जीव दे नाही तर, भगवान राम तुझ्या सारख्या खालच्या विचाराच्या लोकांना धडा शिकवेल.” प्रियंका चतुर्वेदी यांनी हे ट्विट करताना मुंबई पोलिसांना देखील टॅग केले होते.

First Published on: July 5, 2018 8:28 PM
Exit mobile version