जम्मू काश्मीरमधील जंगलात लागलेल्या आगीमुळे जमिनीत पेरलेल्या अनेक भूसुरुंगांचा स्फोट

जम्मू काश्मीरमधील जंगलात लागलेल्या आगीमुळे जमिनीत पेरलेल्या अनेक भूसुरुंगांचा स्फोट

जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील जंगलात आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग इतकी भीषण असून, या आगीमुळे नियंत्रण रेषेजवळील जमिनीत पेरून ठेवलेल्या अनेक भूसुरुंगांचा स्फोट झाला आहे. तसंच, ही आग वेगाने पसरत मेंढर सेक्टरमधील भारतीय सीमेपर्यंत पोहोचली आहे.

सोमवारी एलओसी पलिकडे एका जंगलात मोठी आगल लागली होती. त्यानंतर ही आग पुढे वाढत गेली त्यामुळे सुमारे अर्धा डझन भूसुरुंगांचा स्फोट झाला. हे सुरुंग नियंत्रण रेषेवरून होणारी घुसखोरी रोखण्याकरीता पेरण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील जंगलामध्ये मागील तीन दिवसांपासून आग लागली आहे. या आगीवक नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर शर्तीचे प्रयत्न करत आहे. या संदर्भात फॉरेस्टर कनार हुसेन शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. मात्र बुधवारी सकाळी ही आग दरमशाल ब्लॉकमध्ये सुरू झाली आणि जोराच्या वाऱ्यामुळे वेगाने पसरली. त्यानंतर लष्कराची मदत घेण्यात आली आणि त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

राजौरी जिल्ह्यामध्ये सीमेजवळ सुंदरबनी क्षेत्रामध्ये भीषण आग लागली. ती गंभीर, निक्का, पंजग्रेय, ब्राह्मण, मोगला यांसह इतर वनक्षेत्रात पसरली. कालाकोटच्या कलार, रणथल, चिंगी या जंगलांमध्येही आग लागली.

दरम्यान, आग सीमेपार लागली आणि कांगडी डॉक बन्यादच्या एलओसी परिसरात पसरली. जंगलातील आगीवर कुठल्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याचे समजते. तसंच, सद्यस्थितीत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती मिळते.


हेही वाचा – मध्य प्रदेशच्या निर्णयामुळे राज्यात ओबीसी आरक्षणाच्या आशा पल्लवित

First Published on: May 19, 2022 7:42 AM
Exit mobile version