अयोध्या खटल्यानंतर रस्त्यावर उतरण्याऐवजी करा मंदिरांत पूजाविधी

अयोध्या खटल्यानंतर रस्त्यावर उतरण्याऐवजी करा मंदिरांत पूजाविधी

अयोध्या प्रकरण

अयोध्या खटल्याच्या निकालानंतर रस्त्यावर उतरण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी मंदिरात जाऊन धार्मिक विधी करण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. धार्मिक सलोखा अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. अयोध्या खटल्याचा निकाल आठवड्यावर येऊन ठेपला आहे. या ऐतिहासिक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रेड अलर्ट जाहीर केला आहे. तसेच जिल्ह्यात धार्मिक सलोखा, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठक घेण्यात आली. निकालावेळी भाजपच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी विविध मंदिरांमध्ये जमा होऊन पूजाविधी, आरती करण्याचे सूचित करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे चिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

अवकाळीग्रस्त तीन मतदारसंघात मदतकार्य

ज्या मतदारसंघात भाजप-शिवसेनेचे आमदार नाहीत, तेथे स्थानिक पदाधिकार्‍यांनी अवकाळीग्रस्त भागांची पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सर्वोतोपरी मदत करावी, असेही आदेश यावेळी देण्यात आले. देवळाली, सिन्नर आणि इगतपुरी मतदार संघात प्राधान्याने कार्यकर्त्यांनी मदतकार्य करण्याचेही यावेळी सूचित केले आहे.


हेही वाचा – अयोध्या प्रकरणाचा निकाल उद्या येणार!


 

First Published on: November 8, 2019 9:44 PM
Exit mobile version