Assembly Election: विरोधकांवर मानसिक विजय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, निकालावर प्रशांत किशोरांची खोचक टीका

Assembly Election: विरोधकांवर मानसिक विजय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, निकालावर प्रशांत किशोरांची खोचक टीका

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींपैकी चार राज्यांमध्ये भाजपच्या दणदणीत विजयानंतर पहिल्यांदाच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे विधान समोर आले आहे. चार राज्यांत विजय मिळवल्यानंतर भाजप विरोधकांवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. किशोर यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील सत्तेची खरी लढाई २०२४ मध्ये लढली जाईल. विरोधकांवर मानसिक विजय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी दिली आहे.

प्रशांत किशोर यांनी ट्विट करत लिहिलियं की, भारताची खरी लढाई २०२४ सालीच लढली जाईल आणि ठरवली जाईल. कोणत्याही राज्यांच्या निवडणूक निकालावर हे भवितव्य ठरणार नाहीये. मात्र, हे साहेबांना माहिती आहे. म्हणूनच राज्यांच्या निकालानंतर विरोधकांवर मानसिक विजय प्रस्थापित करण्याचा हा एक चतुर प्रयत्न आहे. त्यांच्या चुकीच्या फसवणुकीला बळी पडू नका, असं ट्विट करत त्यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे.

प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याने लोकसभेसाठी तिसरी आघाडी बनवली जात असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर एक मोठी आघाडी बनवण्यासाठी प्रशांत किशोर प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मात्र, २०२४ च्या निवडणुकीपूर्वी असणाऱ्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूकाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, असं किशोर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवसीय गुजरात दौरा

यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्यानंतर आता सर्वांच्या नजरा गुजरातकडे लागल्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत.


हेही वाचा : …आता खरी लढाई मुंबईत होणार, देवेंद्र फडणवीसांचा थेट शिवसेनेला इशारा


 

First Published on: March 11, 2022 11:41 AM
Exit mobile version