Booster Dose: देशात आता १८ वर्षांवरील वयोगटाला १० एप्रिलपासून दिला जाणार बूस्टर डोस

Booster Dose: देशात आता १८ वर्षांवरील वयोगटाला १० एप्रिलपासून दिला जाणार बूस्टर डोस

Covid Vaccine : देशातील पहिल्या Intranasal Vaccine च्या फेज-2 ट्रायलला मंजुरी, आता मानवावर होणार चाचणी

कोरोना महामारीविरोधातील लढाई आणखीन मजबूत करण्यासाठी सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे. आता १८ वर्षांवरील वयोगटातील लोकांना बूस्टर डोस देण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे. १० एप्रिलपासून १८ वर्षांवरील लोकं खासगी केंद्रात बूस्टर डोस घेऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या डोस घेऊन ज्यांना ९ महिने पूर्ण झाले आहेत, ते बूस्टर डोससाठी पात्र असणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियांनी दिली आहे.

देशातील नागरिकांना लसीकरणाचे सुरक्षा कवच पूर्णपणे देण्यासाठी सरकार वेगाने लसीकरण करत आहे. सरकारने आता आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील लोकांसाठी जे बूस्टर डोस दिले जात आहे, ते देखील वेगाने करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता रविवार, १० एप्रिलपासून १८ वर्षांवरील सर्व लोकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे.

आतापर्यंत देशात सर्व १५ वर्षांवरील लोकसंख्येतील जवळपास ९६ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर १५ वर्षांवरील ८३ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील २.४ कोटींहून अधिक जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. १२ ते १४ वयोगटातील ४५ टक्के मुलांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. दर्यान देशात ६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले होते. १२ ते १४ वयोगटातील मुलांना Corbevax लस दिली जात आहे. Biological E Limited कंपनीने Corbevax लस विकसित केली आहे.


हेही वाचा – RBI Monetary Policy : रिझर्व्ह बँकेचे रेपो दर जैसे थेच; कोणताही बदल नाही


First Published on: April 8, 2022 5:55 PM
Exit mobile version