‘या’साठी केला डोनाल्ड ट्रम्प यांनी १० वर्षाच्या मुलीचा सन्मान

‘या’साठी केला डोनाल्ड ट्रम्प यांनी १० वर्षाच्या मुलीचा सन्मान

'या'साठी केला डोनाल्ड ट्रम्प यांनी १० वर्षाच्या मुलीचा सन्मान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मूळ भारतीय असणाऱ्या एका दहा वर्षाच्या चिमुरडीचा सन्मान केला आहे. ही चिमुरडी कोरोनाशी लढणाऱ्या नर्स आणि अग्निशमन दल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दररोज जेवण आणि कार्ड घेऊन जायची. अशा या श्रव्या अन्नापारेड्डी (१०) हीचा डोनाल्ड ट्रम्प यांनी सन्मान केला आहे.

कोण आहे ही चिमुरडी

श्रव्या अन्नापारेड्डी ही मूळ भारतीय असून ती ‘गर्ल स्काउट ट्रूप’ (Girl Scout Troup) ची सदस्य आहे. ही चिमुरडी हनोवर हिल्स एलीमेंट्री शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. तसेच श्रव्या ‘गर्ल स्काउट’मध्ये असून तिच्यासोबत आणखी तीन विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार; ‘गर्ल स्काउट’मधील या चिमुरड्यांनी स्थानिक डॉक्टर, नर्स आणि अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना १०० जेवणाचे डबे घेऊन जायचे. तसेच या विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने बनवलेले २०० कार्ड देखील त्यांना दिले आहेत.

यांचाही केला सन्मान

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी शुक्रवारी श्रव्यासह कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या अनेक योद्धांचा यावेळी सन्मान केला आहे.


हेही वाचा – डोक्यात टरबूज घालून गेले चोरी करायला आणि…


 

First Published on: May 18, 2020 10:31 PM
Exit mobile version