डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर; गच्छंती होणार?

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर; गच्छंती होणार?

मावळते अध्यक्ष ट्रम्प अडचणीत, कॅपिटल हिल हिंसाप्रकरण भोवलं

अमेरिकेच्या मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात कॅपिटल हिंसाप्रकरणी महाभियोग प्रस्ताव मंजूर पारित करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यांवर मागील आठवड्यात अमेरिकेत झालेल्या कॅपिटल हिल हिंसेत आपल्या समर्थकांना हल्ला करण्यासाठी भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावर अमेरिकेच्या सभागृहात महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच रिपब्लिकनच्याही १० खासदारांनी महाभियोग प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला आहे. ६ जानेवारीला झालेल्या कॅपिटल हिंसाचारात पोलिस अधिकाऱ्यांसह पाच जण ठार झाले होते. ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले अध्यक्ष आहेत ज्यांच्या विरोधात एकाच कालावधीत दोनदा महाभियोग ठराव मंजूर झाला आहे.

मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाईचा बडगा सुरु असताना ट्रम्प यांनी सोशल मिडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी आपली बाजू मांडत कॅपिटल हिंसाप्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. तसेच या घटनेचा निषेध करत शांतता राखण्याचं आवाहन नागरिकांना केले आहे. या घटनेची पुनरावृत्ती होण्यापासून टाळा असेही त्यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले आहे की, हा हिंसाचार मी विश्वास ठेवलेल्या त्या प्रत्येक गोष्टीविरोधात आणि आपल्या चळवळीविरोधात आहे. असा हिंसाचार करणारा माझा खरा समर्थक नाही. त्यामुळे माझ्या समर्थकांपैकी कोणताही समर्थक आपल्या कायद्यासह ध्वजाचा अपमान करणारा नाही. परंतु जर तुम्ही या हिंसाचाराला पाठिंबा देत असाल तर तुम्ही आपल्या चळवळीवर तसेच देशावर हल्ला करत आहात. म्हणून हे सहन करण्यात येणार नाही. अमेरिकेत कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या व्हिडीओत म्हटले आहे. २२३ विरुद्ध २०५ मतांनी मंजूर संसदेत मंजूर झाला आहे.

First Published on: January 14, 2021 8:29 AM
Exit mobile version