पंतप्रधान नरेंद्र मोदी अजिंक्य नाहीत-सोनिया गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी अजिंक्य नाहीत-सोनिया गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी अजिंक्य नाहीत. त्यांनी २००४ चा इतिहास विसरू नये. अटल बिहारी वाजपेयीही अजिंक्य होते, मात्र त्यावेळी आम्हीच जिंकलो होतो. 2004 मध्येही अनेक राजकीय विद्वान मंडळी दावा करत होती अटलबिहारी वाजपेयी पुन्हा निवडून येतील, मात्र त्यांचा दावा खोटा ठरवत जनतेने पुन्हा काँग्रेसला निवडून दिले होते, अशी टीका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केली.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर माध्यमांशी बोलताना सोनिया गांधी यांनी हे भाष्य केले. सोनिया यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पत्रकारांशी संवाद साधला.

सोनिया गांधी यांनी गुरुवारी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याआधी रोड शो काढला तसेच पूजा हवनदेखील करण्यात आला. सोनिया गांधी याआधी 4 वेळा रायबरेली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी, जावई रॉबर्ट वाड्रा व नातवंडेही रेहान आणि मिराया यावेळी त्यांच्यासोबत होती. रायबरेली हा मतदारंसघ गांधी कुटुंबासाठी गड मानला जातो.

याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळख होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी भाजपनेही रणनिती आखली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात विजय कोणाचा होईल हे देशातील जनताच ठरवू शकणार आहे.

First Published on: April 12, 2019 6:05 AM
Exit mobile version