उत्तम नेट कनेक्टिव्हिटी ही पर्यटन स्थळाची पहिली प्राथमिकता – PM Modi

उत्तम नेट कनेक्टिव्हिटी ही पर्यटन स्थळाची पहिली प्राथमिकता – PM Modi

चेन्नई आणि पोर्ट ब्लेयर दरम्यान समुद्राच्या खालून केलेली केबल संपर्क सुविधा (ओएफसी – OFC)चे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३० डिसेंबर २०१८ रोजी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यादरम्यान म्हणाले की, ‘ऑनलाईन अभ्यास असो, पर्यटन कमाई असो, बॅकिंग असो, शॉपिंग असो किंवा दररोजची औषधे असो आता अंदमान आणि निकोबार मधील हजारो कुटुंबांना या सर्व सुविधा ऑनलाईन मिळू शकणार आहेत. आज अंदमानला जी सुविधा मिळाली आहे, त्याचा सर्वात मोठा फायदा तिथे जाणाऱ्या पर्यटकांना होईल. उत्तम नेट कनेक्टिव्हिटी हे आज कोणत्याही पर्यटन स्थळाचे सर्वात पहिली प्राथमिक गोष्ट आहे.’

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘हा जितका मोठा प्रकल्प होता, तितकी मोठी आव्हानेही होती. अनेक वर्षांपासून या सुविधेची गरज असूनही त्यावर काम करणे शक्य नव्हते हे देखील एक कारण होते. परंतु सर्व अडथळे दूर करून काम केल्याचा मला आनंद आहे. समुद्रात सुमारे २३०० किलोमीटर अंतरावर केबल टाकण्याचे हे काम पूर्ण करणे कौतुकास्पद आहे. खोल समुद्र सर्वेक्षण करणे, केबलची गुणवत्तेची देखभाल करणे आणि विशेष जहाजांच्या माध्यमातून केबल टाकणे इतके सोप नाही.’

‘आजचा दिवस अंदमान आणि निकोबारमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. चेन्नई ते पोर्ट ब्लेयर, पोर्ट ब्लेयर ते लिटल अंदमान आणि पोर्ट ब्लेयर ते स्वराज्य बेट अशी सेवा अंदमान आणि निकोबारमध्ये आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे हे संपूर्ण देशासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करीत मला सुमारे दीड वर्षांपूर्वी सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल कनेक्टिव्हिटी प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळाली’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


हेही वाचा – गूड न्युज! दोन दिवसांत मिळेल जगातील पहिली कोरोनाची लस!


 

First Published on: August 10, 2020 1:45 PM
Exit mobile version