यासाठी पंतप्रधान करणार चिमुकल्याचा गौरव

यासाठी पंतप्रधान करणार चिमुकल्याचा गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मगरीने पकडलेल्या काकाचे प्राण वाचविणाऱ्या १५ वर्षीय चिमुकल्या पंतप्रधानांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. सीतू मलिक असे या चिमुकल्याचे नाव आहे. ओडिशामधील केंद्रपाडा जिल्ह्यातील कंदिरा गावात राहणाऱ्या सीतू मलिकला त्याच्या धाडसाबद्दल यंदाचा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या २३ जानेवारी रोजी सीतू मलिकला हा पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहे.

नेमके काय घडले?

ओडिशामधील केंद्रपाडा जिल्ह्यातील कंदिरा गावात राहणारा सेतू मलिक हा विनोद मलिक या आपल्या काकांसोबत नदीवरील शेतात गेले होते. त्या दरम्यान तलावातील मगरीने सेतूच्या काकांचा हात गच्च पकडून ठेवला. सेतू मरणाच्या दारात असतानाच सेतून न घाबरता प्रसंगावधान दाखविले. घाबरुन न जाता सीतून नदीच्या जवळ असलेली काठी घेऊन त्यांनी मगरीच्या डोक्यात मारली. अचानक हल्ला झाल्याने मगरीने घाबरुन तेथून पळ काढला. त्याच्या या साहसाची भारतीय बाल कल्याण परिषदेने दखल घेत त्याला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

केंद्रपाडा जिल्ह्यातील सेतू मलिक या चिमुकल्याची राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाल्याचे कळल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी सेतूचे कौतुक केले आहे. भारतीय बाल कल्याण परिषदेने ही निवड केली असून त्या पुरस्कारासाठी आयसीसीडब्ल्यूचे पत्र जिल्हा प्रशासनाला मिळाले आहे, असे उत्स्फूर्त केंद्रपाडाचे जिल्हाधिकारी दशरथी सत्पथी यांनी दिली आहे.

आमच्या शाळेतील विद्यार्थ्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते सीतूला हा पुरस्कार मिळणार असून, याचा आम्हाला अभिमानाने वाटत आहे.  – महेश्वर राऊत, सीतूच्या शाळेचे मुख्याध्यापक


वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी पार्टटाईम जॉब करतायत!


 

First Published on: December 14, 2018 12:45 PM
Exit mobile version