एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी तुलसीरामाचे पणतू, प्रिन्स तुलीचा दावा

एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी तुलसीरामाचे पणतू, प्रिन्स तुलीचा दावा

एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी तुलसीरामाचे पणतू आहेत, असा दावा बाहदूरशाह जफर यांचे पणतू याकूब हबीबुद्दिन तुसी अर्फ प्रिन्स तुली यांनी केला आहे. त्यांनी यावेळी ओवैसींची वंशावळ दिली आहे. ज्ञानवापी प्रकरणात ओवैसी हे देशातील मुसलमानांचा भडकावत असल्याचा आरोप प्रिन्स तुसी यांनी केला आहे. या प्रकरणी ओवेसींवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. या पूर्वीही प्रिन्स तुली यांनी ओवैसींवर टीका केली आहे.

जगदगुरू परमहंसाचार्यांवर टीका –
प्रिन्स तुली यांनी जगदगुरू परमहंसाचार्य चांच्यावर टीका केली आहे. अयोध्येत जगदगुरु परमहंसाचार्य यांनी सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी आग्र्याच्या जातगंज पोलीस ठाण्यात तुली यांनी तक्रार दाखल केली असून या प्रकणात कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. तुली यांनी आपली तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुखमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह उत्तर पर्देशच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पूर्वी सुद्धा वादग्रस्त वक्तव्य –
प्रिन्स तुली यांनी यापूर्वीसुद्धा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुली हे हैदराबादचे राहणारे आहेत. ते स्वत:ला मुघरांचे वंशज म्हणवून घेतात. 17 डिसेंबर 2018 रोजी त्यांनी केलेल्या वक्तव्यात बाबरचा संदर्भ दिला आहे. बाबरने मृत्यृवेळी हुमायूशी आपल्या मृत्यूपत्राबाबत चर्चा केली होती. त्यावेळी बाबर म्हणाला होता की, मीर बाकी याने अयोध्येत जे प्रकार केला आहे, त्यामुळे तैमूरच्या पूर्ण खाणदानावर कलंक लागला आहे. जर हुमायूला या देशावर राज्य करायचे असेल तर संत-मंहतांचा आदर करा, असा सल्लाही बाबरने दिल्याचे प्रिन्स तुली यांनी म्हटले आहे.

राम मंदिरावर केले वक्तव्य –
राम मंदिराला बाबरच्या वंशजांचा विरोध नसल्याची भूमिका त्यांनी माडंली होती. मंदिराचे संरक्षण करा आणइ देशात समान न्यापद्धतीचा अवलंब करा , असा सल्ला बाबराने हुमायूला दिला होता. त्यावेळी विवादित भूमीवर जर रामाचे मंदिर होत असेल तर बाबरचा वंशज म्हणून याबाबत आपल्याला कोणतीही आपत्ती नाही. आणि जर मंदिराची उभारणी होत असेल तर पहिली विट ठेवायला आपण जाऊ, असे वक्तव्यही प्रिन्स तुली यांनी त्यावेळी केले होते.

First Published on: June 4, 2022 1:51 PM
Exit mobile version