‘दिल्लीत खासगी कार्यालयं आणि बाजारपेठा उघडण्यास संमती’

‘दिल्लीत खासगी कार्यालयं आणि बाजारपेठा उघडण्यास संमती’

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिल्लीत खासगी कार्यालये आणि बाजारपेठा उघडण्यास केजरीवाल सरकारने संमती दिली आहे. मात्र, जास्तीत जास्त कर्मचारी घरुन काम करतील असे पाहावे, असेही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले आहेत.

दरम्यान, बाजारपेठाही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. मात्र, दुकाने उघडण्यासाठी ऑड – इव्हन तारखांचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. काही वेळापूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात घोषणा केली आहे.


हेही वाचा – महाराष्ट्रासह ‘या’ तीन राज्यातून येणाऱ्या लोकांना कर्नाटकमध्ये प्रवेश नाही


 

First Published on: May 18, 2020 6:27 PM
Exit mobile version