घरदेश-विदेशमहाराष्ट्रासह 'या' तीन राज्यातून येणाऱ्या लोकांना कर्नाटकमध्ये प्रवेश नाही

महाराष्ट्रासह ‘या’ तीन राज्यातून येणाऱ्या लोकांना कर्नाटकमध्ये प्रवेश नाही

Subscribe

३१ मे पर्यंत महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडूमधून येणाऱ्या लोकांना राज्यात प्रवेश करण्याची परवानगी नाही, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी जाहीर केलं आहे.

कर्नाटक सरकारने महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडूतील या चार राज्यातून येणाऱ्या लोकांना राज्यात प्रवेश बंदी घातली आहे. ३१ मे पर्यंत महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडूमधून येणाऱ्या लोकांना राज्यात प्रवेश करण्याची परवानगी नाही, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा म्हणाले. याशिवाय राज्यातील सर्व दुकाने उघडण्यास आणि इतर राज्यांत जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. आता राज्यातील सर्व दुकाने उघडली जाऊ शकतात आणि इतर राज्यात जाण्यासाठी गाड्यादेखील सुरू केल्या जातील, असं मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले.

दरम्यान, राज्यात खासगी आणि रस्ते राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांना देखील परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय सरकारकडून देण्यात येत असलेल्या सवलती फक्त रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन क्षेत्रासाठी आहेत. राज्य सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे की कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनच्या काळात कडक कारवाई केली जाईल तर अन्य भागात आर्थिक घडामोडींना परवानगी दिली जाईल. रविवारी राज्य संपूर्ण लॉकडाऊन असेल.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली


विशेष म्हणजे तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन कालावधी १७ मे रोजी म्हणजेच रविवारी संपला आहे, तर चौथा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. चौथा टप्पा ३१ मे पर्यंत असणार आहे. परंतु यावेळी लोकांना अनेक सुविधा दिल्या जाण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात लॉकडाऊनचा चौथा टप्पा खूप वेगळा असेल असं म्हटलं होतं. तिसर्‍या टप्प्यात सरकारने दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी या काळात लोकांना सामाजिक अंतर आणि इतर मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं गेलं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -