आजपासून प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर

आजपासून प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर

प्रियांका गांधी (फाईल फोटो)

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आजपासून चार दिवस उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असणार आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्या पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर जात असून त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच राज्याच्या पश्चिम भागाची जबाबदारी असलेले काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिधिंया असणार आहेत. दरम्यान, त्यांचा रोड शोदेखील होणार आहे. काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, दौऱ्यांची सुरुवात हे तिनही नेते लखनौच्या काँग्रेस मुख्यालयात जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करतील. राहुल गांधी सोमवारीच दिल्लीला परतण्याची शक्यता असून प्रियंकाचा दौरा मात्र चार दिवसांचा आहे.

लोकसभेच्या ४२ जागांची जबाबदारी 

लखनौमध्ये प्रियांका गांधी आणि ज्योतिरादित्य सिधिंया १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत काँग्रेस मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा असून त्यातील ४२ जागांची जबाबदारी प्रियांका गांधींकडे आहे. या दौऱ्यावर प्रत्येक मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना भेटून तेथील स्थिती जाणून घेणार आहेत. उत्तरेच्या पूर्व भागातील वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असून तेथे प्रियांका यांचा लोकसभा निवडणुकीत किती प्रभाव पडेल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेससाठी चुरशीची लढत 

काँग्रेसला दूर ठेवून मायावतींची बसपा आणि मुलायमसिंग यांची सपा यांनी युती केल्याने राज्यात चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने प्रियांका गांधींना उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिल्याने भाजप काहीसा चिंताग्रस्त झाला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकात काँग्रेसने रायबरेली तसेच अमेठी या दोनच जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने ७१, त्याचा मित्रपक्ष अपना दलने २ जागांवर विजय मिळवला होता.

हेही वाचा –

प्रियंका गांधींची राजकारणात एन्ट्री; काँग्रेस सरचिटणीस पदी नियुक्ती

रायबरेलीतून सोनियांऐवजी प्रियांका गांधी निवडणूक लढणार?

काॅंग्रेसची मतं आणि भाजपाच्या जागा वाढवणार प्रियांका गांधी!

First Published on: February 11, 2019 8:08 AM
Exit mobile version