घरदेश-विदेशरायबरेलीतून सोनियांऐवजी प्रियांका गांधी निवडणूक लढणार?

रायबरेलीतून सोनियांऐवजी प्रियांका गांधी निवडणूक लढणार?

Subscribe

सोनिया गांधीऐवजी प्रियांका गांधी - वाड्रा रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सोनिया गांधी यांच्याशी बोलणे झाल्यावर यावर अंतिम निर्णय होणार आहे.

लोकसभा २०१९च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आता रणनिती आखायला सुरूवात केली आहे. त्यामुळे काँग्रेस अनेक मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशातील रायबरेली या मतदारसंघातून सोनिया गांधी नाही तर प्रियांका गांधी -वाड्रा निवडणुकीच्या रिंगणार उतरणार आहेत. सुत्रांनी तशी माहिती दिली आहे. प्रियांका गांधी – वाड्रा यांच्या निवडणूक लढवण्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून यावर देखील लवकरच निर्णय होणार आहे. रायबरेली हा काँग्रेसचा गड मानला जातो. याच मतदारसंघातून सोनिया गांधी निवडणूक लढवतात. त्यामुळे त्यांच्या जागी आता प्रियांका गांधी – वाड्रा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यापूर्वी प्रियांका गांधी यांनी आई सोनिया गांधी यांच्यासाठी रायबरेलीतून तर भाऊ राहुल गांधी यांच्यासाठी अमेठीमध्ये प्रचार केला आहे. त्याचवेळी प्रियांका गांधी – वाड्रा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? यावर चर्चा सुरू झाली होती. शिवाय, प्रियांका गांधी – वाड्रा यांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावे अशी इच्छा काँग्रेसचे काही नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील व्यक्त केली होती. पण, आता प्रियांका गांधी- वाड्रा निवडणुकीच्या रिंगणार उतरणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

वाचा – पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहुल गांधी नाहीत?

काँग्रेस आक्रमक

कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचा सत्तेवरून खाली खेचायचे यासाठी काँग्रेस आता आक्रमक झाली आहे. त्यासाठी रणनिती देखील आखली जात आहे. समविचारी पक्षांना एकत्र घेत लोकसभा २०१९ची निवडणूक लढण्याची काँग्रेसची तयारी आहे. त्यासाठी समविचारी आणि प्रादेशिक पक्षांशी बोलणी सुरू आहे. उत्तरप्रदेशमध्ये देखील काँग्रेसने सपा, बसपाशी बोलणी केली आहेत. बिहारमध्ये देखील काँग्रेस राजकीय गणिते जुळवत आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेशी युती करणार का? असा सवाल विचारला असता आमच्या विचारधारा भिन्न असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. २०१४च्या तुलनेत काँग्रेस २०१९ साली उत्तम कामगिरी करेल असा विश्वास काँग्रेसला आहे.

- Advertisement -
वाचा – संसदेमध्ये अविश्वास ठरावावर चर्चा; राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान गोंधळ

काँग्रेस वर्किंग कमिटीशी बैठक

शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी काँग्रेस वर्किंग कमिटीशी संवाद साधणार आहे. अध्यक्षपदाची धुरा शिरावर घेतल्यापासून काँग्रेस वर्किंग कमिटी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये झालेली ही दुसरी मीटींग असणार आहे. यावेळी मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील युतीवर देखील काँग्रेस वर्किग कमिटीशी चर्चा होणार आहे. ५ जुलै रोजीच राहुल गांधी यांनी अमेठीतून प्रचाराची सुरूवात केली आहे. दरम्यान, विरोधकांमधून पंतप्रधानपदाचा दावेदार कोण असेल यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

वाचा – ‘पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी योग्य उमेदवार’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -