भाजपने अमेठीतील सरपंचांना २०-२० हजारांची पाकिटं वाटली – प्रियंका गांधी

भाजपने अमेठीतील सरपंचांना २०-२० हजारांची पाकिटं वाटली – प्रियंका गांधी

प्रियंका गांधी वाड्रा

आपल्या भावासाठी म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी प्रचाराच्या रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजप काँग्रेसच्या विरोधात फक्त चूकीचा प्रचार करत नाही तर ते गावातील सरपंचांना पाकिटातून पैसे पाठवत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. दरम्यान, भाजपवाल्यांना असे वाटत आहे की, अमेठीतील सरपंचांना २० हजार रुपयांमध्ये विकला जाईल.

भावासाठी बहीण करतेय प्रचार

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. त्याचसोबत ते केरळच्या वायनाड या लोकसभा मतदार संघातून देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र काँग्रेचा परंपरागत मतदार संघ असलेल्या अमेठीसाठी गांधी परिवाराने प्रतिष्ठापणाला लावली आहे. अमेठीमधून पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपकडून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. हा मतदारसंघामध्ये काँग्रेचा विजय व्हावा यासाठी प्रियंका गांधी गेल्या काही दिवसापासून जोरदार प्रचार करत आहेत.

सरपंचांना २० हजार रुपये वाटत आहे

पहिल्यांदा सक्रिय राजकारणात उतरलेल्या प्रियंका गांधी यांनी शनिवारी अमेठी लोकसभा मतदार संघामध्ये जनसभा घेतली. या सभे दरम्यान त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. ‘भाजप काँग्रेसच्याविरोधात चूकीचा प्रचार करत आहे. पैसे देखील वाटत आहे. मी गावाच्या सरपंचांना पाकिटामध्ये घोषणापत्र पाठवत आहे तर दुसरीकडे भाजपवाले पाकिटाच्या आतमध्ये २० हजार रुपये टाकून पाठवत आहेत.

स्मृती इराणी अमेठीत येऊन नाटक करतात

दरम्यान पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, ‘सुध्दा हसण्याची गोष्ट आहे की, भाजपवाल्यांना वाटत आहे की, अमेठीतील सरपंचांना २० हजार रुपयांमध्ये विकला जाईल. त्यांना असे देखील वाटत आहे की, जे नेहरु-गांधी घराण्यापासून पिढ्यांपिढ्या चालत आलेले प्रेम आणि खऱ्या राजकारणाला २० हजारामध्ये विकत घेऊ. दरम्यान, प्रियंका गांधी यांनी भाजपच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर देखील टीका केली आहे की, राहुल गांधी यांना बेपत्ता बोलणाऱ्या स्मृती इराणी या अमेठीमध्ये येऊन नाटक करतात. स्मृती इराणी फक्त १६ वेळा अमेठीमध्ये आल्या आहेत तर राहुल गांधी त्यांच्यापेक्षा दुप्पटवेळा अमेठीत आले असल्याचे प्रियंका गांधी यांनी सांगितले’

First Published on: May 4, 2019 5:02 PM
Exit mobile version