पुलवामा हल्ल्यानंतर आदिलच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

पुलवामा हल्ल्यानंतर आदिलच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

सोेजन्य जागरण

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० पेक्षा जास्त सीआरपीएफच्या जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्नद या दहशवादी संघटनेने घेतली आहे. या हल्ला घडवून आणलेला आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद याच्या वडिलांनी एका वृत्तसंस्थेशी बातचित केली आहे. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाले त्याचे वडिल 

आदिल अहमदच्या वडिलांचे नाव गुलाम हसन डार असे आहे. आत्मघातकी हल्ल्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले आहे की, आम्ही तीन वर्षाआधी ज्या दुःखातून गेलो आहोत. त्याच दुःखातून आता जवानांचे कुटुंबिय जात आहे, अशी प्रतिक्रिया अदिलच्या वडिलांनी दिली. पुढे त्यांनी सांगितले की, २०१६ या वर्षी अदिल आणि त्याचे मित्र शाळेतून घरी परतत असताना सुरक्षा दलातील काही सैनिकांनी आदिल आणि त्यांच्या मित्रांना दगड मारण्याच्या आरोपाखाली पकडून मारले होते. त्यामुळे आदिलचा सुरक्षा दलातील सैनिकांवर राग होता. त्या घटनेनंतर आदिल दहशदवादी संघटनेत सामील झाला, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच त्याच्या आई-वडिलांना सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याबद्दलची कल्पना नव्हती, असेही त्यांनी सांगितले. १९ मार्चला आदिल कामानिमित्त घराबाहेर पडला तो पुन्हा घरी आलाच नाही. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला अनेक ठिकाणी शोधलं. शेवटी तीन महिन्यांनी आदिल सापाडला आणि त्याला सुखरुप घरी आणले गेले.

दोन वर्षांपूर्वी संघटनेत सामील

पुलवामा येथे हल्ला झाल्यानंतर काही वेळातच आत्मघातकी आदिलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये आदिलने सैनिकांचे कपडे परीधान केले होते आणि हातामध्ये रायफल होती. तसेच त्याच्या पाठीमागे ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेचा बॅनर असल्याचं दिसत होता. आदिल हा २२ वर्षीय असून दक्षिण काश्मीरमधील गुंडिबाग गावाचा रहिवासी होता. दोन वर्षापूर्वी तो ‘जैश-ए-मोहम्मद’या दहशवादी संघटनेत सामील झाला. मागील एक वर्षापासून त्या हल्ल्याची तयारी सुरु होती. याशिवाय तो काश्मिरी मुस्लिमांच्या प्रश्नांविषयीही बोलला आहे.

First Published on: February 16, 2019 4:04 PM
Exit mobile version