पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड सज्जाद मुदस्सीरचा खात्मा

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड सज्जाद मुदस्सीरचा खात्मा

प्रातिनिधिक फोटो

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी चकमक सुरु झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी पुन्हा एकदा त्रालमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या चकमकीत पुलवामाच्या मास्टरमाईंडच खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. पुलवामा जिल्ह्याचा मास्टरमाईंड सज्जाद मुदस्सीरला ठार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहे हा सज्जाद मुदस्सीर

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला करण्यात आला होता. या हल्लाचा मास्टरमाईंड सज्जाद मुदस्सीर याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आल्याची माहिती समोर आली आहे. त्रालमध्ये झालेल्या चकमकीत सज्जाद मुदस्सीर ठार झाला आहे. पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भ्याड हल्ल्यात सज्जाद मुदस्सीरच्या गाडीचा वापर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भ्याड हल्याचा मास्टरमाईंड सज्जाद मुदस्सीरचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. रविवार पासून सुरु असलेल्या चकमकीत दरम्यान पुवामाचा मास्टरमाईंड सज्जाद मुदस्सीरच्या घराच्याभोवती सापळा लावण्यात आला होता. या झालेल्या चकमकीत मास्टरमाईंड सज्जाद मुदस्सीरचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती सेना, सीआरपीएफ आणि पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे.

पिंगलिश गावात चकमक

पुलवामामधील पिंगलिश गावात रविवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चमकम झाली. या चकमकीनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंगलिश गावात दहशतवादी लपलेल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार; लष्कराची ४२ राष्ट्रीय रायफल्सची तुकडी, जम्मू – काश्मीर पोलिसांचे एसओजी आणि सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहिम हाती घेतली होती, अशी माहिती सुरक्षी दलांकडून देण्यात आली आहे.

इंटरनेट सेवा बंद

सुरक्षा दलांनी परिसर घेरल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवानांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. तसेच सुरक्षा दलाने देखील प्रत्युत्तर देत गोळीबार केला. या गोळीबारात तीन दहशतवाद्यांचा करत तीन दहशतवाद्यांचा ठार केले आहे. मात्र परिसरात अजूनही शोध मोहीम राबवण्यात येत आहे. तसेच खबरदारी म्हणून सीआरपीएफचे जवान मोठ्या संख्येने तैनात असून या परिसरातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.


वाचा – पंजाब विधानसभेत सिद्धूची शाब्दिक चकमक

वाचा – ‘अभिनंदन चायवाला’ व्हायरल झालेला ‘तो’ फोटो फेक


 

First Published on: March 11, 2019 9:48 AM
Exit mobile version