घरट्रेंडिंग'अभिनंदन'च्या शौर्याची कथा आता पाठ्यपुस्कात

‘अभिनंदन’च्या शौर्याची कथा आता पाठ्यपुस्कात

Subscribe

शालेय विद्यार्थांना शौर्यांचे धडे गिरवता यावेत याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे.

भारतीय हवाई दलाचे जवान विंग कंमाडर अभिनंदन वर्धमान यांनी केलेल्या शौर्याचे सगळ्यांनीच कौतुक आणि अजूनही त्याबद्दल चर्चा केली जात आहे. यादरम्यान अभिनंदन यांची शौर्यकथा शाळांमधील पाठ्यपुस्तकातून देखील विद्यार्थांना अभ्यासता येणार आहे. शालेय विद्यार्थांना शौर्यांचे धडे गिरवता यावेत याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. सोमवारी ट्विट करुन राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह दोतसरा यांनी यासंदर्भात माहिती दिली. अभिनंदन यांनी केलेल्या धाडसी पराक्रमाचे कौतुक आणि सन्मान व्हावा यासाठी शिक्षणमंत्री गोविंदसिंह दोतसरा यांनी हा निर्णय घेतला. ही माहिती ट्विटसह फेसबुक पोस्टद्वारे देखील सांगितली.

- Advertisement -

समितीचा प्रस्तावास होकार

शालेय विद्यार्थांना शौर्यांचे धडे गिरवता यावेत याचा निर्णय राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह दोतसरा यांनी जरी घेतला असला तरी, कोणत्या वर्गातील विद्यार्थांना नेमका हा धडा असेल याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही. अभिनंदनच्या शौर्यासोबत पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींची कथा देखील या धड्यात समाविष्ट केली जाणार आहे. अभ्यासक्रम तयार करणाऱ्या समितीने या विषयीचा प्रस्ताव स्विकारला आहे.

‘अभिनंदन’वर चित्रपट बनवण्यास निर्मात्यांमध्ये रस्सीखेच

याच पार्श्वभूमीवर ‘अभिनंदन’च्या शौर्यावर आधारीत चित्रपट बनवण्यास निर्माते देखील उत्सुक आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि भारतीय वायुदलाच्या एअर स्ट्राइकवर चित्रपट काढण्यास निर्मात्यांमध्ये चढा-ओढ सुरू झाली आहे. भारताच्या काश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेला भ्याड हल्ला, त्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देताना केलेलं एअर स्ट्राइक. तसेच मिग २१ विमान कोसळल्याने पाकिस्तानच्या ताब्यात अडकलेले विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या शौर्याची गाथा सांगणारा चित्रपट, मालिका किंवा वेबसीरिज काढण्यास निर्मात्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.

- Advertisement -

अशा नावांची झाली नोंद

‘बालाकोट’, ‘सर्जिकल स्ट्राइक्स २.०’, ‘पुलवामा अटॅक्स’ यांसारख्या शीर्षकांची नाव पुढे आली आहेत. आतापर्यंत ‘पुलवामा’, ‘पुलवामा : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘वॉर रुम’, ‘हिंदुस्तान हमारा है’, ‘पुलवामा टेरर अटॅक’, ‘द अटॅक्स ऑफ पुलवामा’, ‘ATS- वन मॅन शो’ या नावांची नोंदणी झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -