Pulwama Live Updates : पालम विमानतळावर मोदी, राहुल गांधी यांनी वाहिली शहीदांना श्रद्धांजली

Pulwama Live Updates : पालम विमानतळावर मोदी, राहुल गांधी यांनी वाहिली शहीदांना श्रद्धांजली

नरेंद्र मोदी यांनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली

पालम एअरपोर्टवर जवानांचे पार्थिव पोहोचले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.    
Kishor Gaikwad

पालम विमानतळावर शहीदांचे पार्थिव आणले गेले आहेत.

Kishor Gaikwad

उद्या संसदेच्या ग्रंथालयात सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत पुलवामा हल्ल्याची चर्चा केली जाणार आहे.

Kishor Gaikwad

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून आम्ही भारताच्या नागरिकांसोबत असल्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला आहे.

My Mahanagar Team

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष सत्र बोलवा, शिवसेेनेचे खासदार संजय राऊत यांची मागणी

My Mahanagar Team

गृहमंत्री राजनाथ सिंह आणि जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत श्रीनगर येथे बैठक सुरु

First Published on: February 15, 2019 2:48 PM
Exit mobile version