Pulwama Terror Attack – अखेर १८ तासांनी चकमक संपली

Pulwama Terror Attack – अखेर  १८ तासांनी चकमक संपली

जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी जवानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे रविवारी रात्रीपासून चकमक सुरु होती. ही चकमक तब्बल १८ तासांनी संपल्याचे समोर आले आहे. या चकमकीत मेजरसह चार जवान शहीद झाले असून तीन जवानांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या चकमकीत जम्मू – काश्मीरचे पोलीस उपमहानिरीक्षक अमित कुमार आणि सैन्याचे ब्रिगेडियर यांच्यासह अनेक सैनिक जखमी झाले आहेत.

पिंगलेना गावात सोमवार सकाळपासून दगडफेक सुरु होती. परिणामी सीआरपीएफच्या पथकांना येथे सैन्याच्या ऑपरेशन दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेसाठी तैनात करण्यात आलं होतं. या दरम्यान क्रॉस फायरिंगमध्ये डीआयजी अमित कुमार यांच्या पोटाला गोळी लागली आहे. तर अन्य एका अधिकाऱ्यांच्या पायाला गोळी लागली आहे. यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हेलिकॉप्टरने उपचारांसाठी दिल्लीला पाठवण्याची तयारी करण्यात येत आहे. या घटनेतील सैन्याच्या एका ब्रिगेडियरना देखील पोटात गोळी लागली आहे. त्यांना श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तीन दहशतवाद्यांचा खात्मा

पिंगलेना गावात सुरु असलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. सैन्याच्या राष्ट्रीय रायफल्स आणि निमलष्करी दलाच्या पथकाने ज्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले त्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन टॉप कमांडर्सचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामापासून २१ किलोमीटरवर असलेल्या पिंगलेना येथे पहाटे ३ वाजल्यापासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. दहशतवाद्यांना चोखप्रत्युत्तर देत असताना मेजरसह चार जवान शहीद झाले आहे. तर या चकमकी दरम्यान एका स्थानिक नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. चकमकीत शहीद झालेले सर्व जवान ५५ राष्ट्रीय रायफल्सचे असून गोळीबार करणारे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशवादी संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.


हेही वाचा – लष्कराला मोठे यश; पुलवामा हल्ल्याच्या २ मास्टरमाईंडचा खात्मा

हेही वाचा – काश्मीरमध्ये सार्वमत घ्यायला सरकार घाबरतं का?- कमल हसन


 

First Published on: February 18, 2019 9:31 PM
Exit mobile version