घरदेश-विदेशPulwama Terror Attack - हा मार्ग जवानांसाठी ठरतोय 'धोकादायक'

Pulwama Terror Attack – हा मार्ग जवानांसाठी ठरतोय ‘धोकादायक’

Subscribe

श्रीनगरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेला १५ किलोमीटरचा पट्टा ठरत आहे धोकादायक.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवारी इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला. हा हल्ला त्याच मार्गावर करण्यात आला होता ज्या मार्गावर या आधी देखील अनेकदा दहशतवादी हल्ले करण्यात आले असून त्या हल्ल्यामध्ये जवान शहीद झाले आहेत. त्याच मार्गावर वारंवार हल्ले का होत आहेत. याचा शोध घेतला जात आहे. हल्ला झालेल्या घटनास्थळी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सीएफएसएलच्या स्वतंत्र पथकांकडून तपास सुरु आहे.

हाच ‘तो’१५ किमीचा पट्टा

राष्ट्रीय महामार्गावर पंपोर ते अवंतिपोरामधील १५ किलोमीटरच्या पट्ट्यातच सुरक्षा दलांना वारंवार लक्ष्य केले जात आहे. या पट्ट्यातच सुरक्षा दलांना का वारंवार लक्ष्य केले जात आहे. याचा शोध राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सीएफएसएलकडून करण्यात येत असून लीथपोरा या भागाची पहाणी केली जात आहे.

- Advertisement -

कुठे आहे हा मार्ग

श्रीनगरपासून ३० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. पंपोर ते अवंतिपोरामधील १५ किलोमीटरचा हा पट्टा आहे. तसेच तपास यंत्रणेनी हल्ला झालेल्या ठिकाणाहून फोटो, व्हिडिओ तसेच न्यायवैद्यक तपासणीसाठी काही नमुने देखील गोळा केले आहेत. एनआयएच्या पथकाने सीआरपीएफच्या ताफ्यातील जवानांशी चर्चा करुन नेमंक त्यावेळी काय घडलं ते समजून घेण्याच प्रयत्न देखील केला आहे. तसेच हल्ल्याच्याआधी आणि नंतर या भागातून झालेल्या संशयास्पद कॉल्सचा सुद्धा एनआयए तपास करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या मार्गावरील पंपोर ते अवंतिपोरा या १५ किलोमीटरच्या पट्ट्यात लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांची तैनात असून देखील याआधी सुद्धा सुरक्षा दलांवर अनेक हल्ले झाले आहेत. २०१४ साली देखील याच पट्ट्यात बीएसएफच्या जवानांवर गोळीबीर करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये दहापेक्षा जास्त जवान शहीद झाले होते. त्यानंतर २५ जून २०१६ रोजी याच पट्ट्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यातीस बस अडवली होती. ही बस अडवून त्यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात देखील आठ जवान शहीद झाले होते. तर २० पेक्षा जास्त जवान जखमी झाले होते. याच पट्ट्यात सुरक्षा दलांवर का हल्ले होत आहेत ते शोधून काढण्याचे लक्ष्य एनआयएससमोर आहे.

- Advertisement -

या हल्ल्यात वापरण्यात आले होते ‘आरडीएक्स’

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात १० ते १५ किलो आरडीएक्स वापरण्यात आल्याची शक्यता आहे. प्राथमिक तपासातून ही माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – pulvama attcked:दिल्लीतील बैठकीत सर्वपक्षीयनेत्याचा सरकारला पाठिंबा

हेही वाचा – पुण्यात पाकिस्तानी झेंड्यासोबत ‘लायटर फ्री’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -