पंजाबमध्ये शहिदांच्या कुटुंबीयांना मासिक पेंशन जाहीर

पंजाबमध्ये शहिदांच्या कुटुंबीयांना मासिक पेंशन जाहीर

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा, राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द

भारतासाठी शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट येऊ नये म्हणून पंजाब सरकार लवकरच मासिक पेंशन योजना सुरु करणार असल्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे. रविवारी सिंग यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या कॉन्स्टेबल कुलविंदर सिंग याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ही घोषणा केली. याचबरोबर गावाला जोडणारा रस्ता आणि गावातील शाळेलाही शहिद जवानाचे नाव देण्याची घोषणा त्यांनी केली. पंजाबच्या राऊली गावात मुख्यमंत्र्यांनी ही भेट घेतली. यावेळी शहिदांच्या कुटुंबांना १० हजारांची मासिक पेंशन सुरु करण्याचे आश्वासन ही त्यांनी दिले.

कुटुंबीयांना भेटून झाले दुःखी

शहिद जवानाच्या कुटुंबाला सरकारकडून पाच लाखांची आर्थिक मदत लवकरच मिळेल असेही त्यावेळी म्हणाले. शहिद जवानाच्यां कुटुंबीयांची सान्तवनही त्यांनी यावेळी केली. ही पेशंनची रक्कम संरक्षण सेवा कल्याण विभागाकडून दिली जाणार आहेत. शहिद जवानांच्या कुटुंबीयांना भेटून दुःख झाले असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे.

First Published on: February 18, 2019 9:45 AM
Exit mobile version