अवघ्या ४ महिन्यात १०० किलोमीटर प्रवास करत भारतातला वाघ बांगलादेशात, रेडिओ कॉलरने झाला ट्रॅक

अवघ्या ४ महिन्यात १०० किलोमीटर प्रवास करत भारतातला वाघ बांगलादेशात, रेडिओ कॉलरने झाला ट्रॅक

प्रातिनिधीक फोटो

पश्चिम बंगालच्या सुंदरवनमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रेडिओ कॉलरने भारतातला वाघ ट्रॅक झाल्याचे सांगितले आहे. अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत, भारतातील हा वाघ जंगल आणि नदी पार करून १००किमीचा प्रवास करीत बांगलादेशला पोहोचलाय. मुख्य वन्यजीव वॉर्डन व्ही. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मेल टायगर रेडिओ कॉलरने ट्रॅक करण्यात आला होता. सिग्नलच्या मदतीने वाघाच्या हालचालींचा मागोवा घेतला जात होता. वाघांना बशीरहाट रेंज अंतर्गत हरिखली कॅम्पजवळ पकडले गेले होते आणि त्यानंतर २७ डिसेंबर रोजी त्याला सोडण्यात आले.

यासह यादव असेही म्हणाले, ‘काही दिवस भारतीय सीमेवर थांबल्यानंतर वाघ तलपट्टी बेटामार्गे बांगलादेश सीमेवर पोहोचला. त्याने छोटो हरिखाली, बोडो हरिखाली आणि रायमंगल या नद्याही पार केल्या होत्या. ११ मे रोजी अखेरचा सिग्नल मिळेपर्यंत त्याने तीन बेटांना पार केले होते. सर्वाधिक काळ तो बांगलादेशात राहिला. विशेष म्हणजे या चार महिन्यांच्या काळात तो मानवी लोक वस्तीच्या जवळ देखील फिरकला नाही.

वन विभाग आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ (इंडिया सुंदरबन चॅप्टर) च्या वतीने या संयुक्त प्रकल्पातील उद्दीष्ट म्हणजे वाघ आणि गावकरी यांच्यातील प्रभाव लक्षात घेणे हा आहे. यादव पुढे म्हणाले, ‘वाघाचा मृत्यू झाल्यास रेडिओ सिग्नलही दिला जातो. पण तसे झाले नाही, म्हणजे तो सुरक्षित आहे. कदाचित कॉलर रेडिओ वाघाच्या मानेवरून सरकला असावा किंवा नदीच्या पाण्यातील खारटपणामुळे तो खराब झाला असेल. ‘


दाऊद गॅंगच्या फईम मचमचकडून बिल्डरला ५० लाखांच्या खंडणीसाठी फोन

First Published on: June 14, 2021 5:31 PM
Exit mobile version