घरताज्या घडामोडीदाऊद गॅंगच्या फईम मचमचकडून बिल्डरला ५० लाखांच्या खंडणीसाठी फोन

दाऊद गॅंगच्या फईम मचमचकडून बिल्डरला ५० लाखांच्या खंडणीसाठी फोन

Subscribe

घाटकोपर येथील एका बड्या बांधकाम व्यवसायिकाला ५० लाख रूपयांच्या खंडणीसाठी धमकीचे फोन आल्यामुळे बांधकामी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. हा धमकीचा फोन अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या अतिशय जवळच्या मानल्या जाणाऱ्या फईम मचमच नावाने आला असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथक करीत आहे.

- Advertisement -

घाटकोपर पश्चिम येथे राहणाऱ्या एका बड्या बांधकाम व्यवसायिकला मागील काही आठवड्यापासून इंटरनॅशनल क्रमांकावरून खंडणीसाठी सतत धमकीचे फोन येत आहे. फोन करणारी व्यक्ती दाऊद टोळीच्या नावाने धमकी देत असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. या प्रकरणी या बांधकाम व्यवसायिकाने मुंबई गुन्हे शाखा या ठिकाणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे, खंडणी विरोधी पथकाने तीन दिवसापूर्वी बांधकाम  व्यवसायिकाला घेऊन घाटकोपर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथकाने स्वतःजवळ ठेवला आहे. 

सूत्राच्या म्हणण्यानुसार फोन करणारी व्यक्ती हि इंटरनॅशलनल मोबाईल क्रमांकावरून खंडणीसाठी धमकी देत आहे. गुन्हे शाखेने हे प्रकरण गंभीरपणे घेतले असून या गुन्ह्याची माहिती देण्यास पोलिसांनी स्पष्ट नकार दिला आहे. मात्र घाटकोपर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक पोलीस सूत्रांची दिली आहे. 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -