मोदी सर्व सरकारी संस्था उद्ध्वस्त करत आहेत – राहुल गांधी

मोदी सर्व सरकारी संस्था उद्ध्वस्त करत आहेत – राहुल गांधी

राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल चढवला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी थेट ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत मोदी सर्व सरकारी संस्था उद्धवलस्त करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. केंद्र सरकार आणि आरबीआयमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. त्याच धर्तीवर सध्या रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची महत्वाची बैठक सुरू आहे. त्याचवेळी राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरवरून हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी आरबीआयचे गवर्नर उर्जित पटेल पंतप्रधान नरेंद्र मोदींना जागा दाखवतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. देशातील प्रत्येक संस्था ताब्यात यावी यासाठी मोदी आणि त्यांचा गट प्रयत्नशील असल्याचा आरोप देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पण, उर्जित पटेल आणि त्याचे सहकारी त्यांना जागा दाखवतील अशी अपेक्षा देखील राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली आहे. सध्या आरबीआय आणि सरकारमधील संघर्ष हा शिगेला पोहोचला आहे. त्याच पार्श्वभूमिवर ऊर्जित पटेल राजीनामाम देतील अशी चर्चा होती. पण, अद्याप तरी ही गोष्ट गुलदस्त्यातच आहे.

First Published on: November 19, 2018 3:34 PM
Exit mobile version