मी माशाचा डोळा बघितला आहे, त्याला बाण मारणारच – राहुल गांधी

मी माशाचा डोळा बघितला आहे, त्याला बाण मारणारच – राहुल गांधी

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

“मी माशाचा डोळा बघितला आहे, त्याला बाण मारणारच” अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नागपूर येथे कस्तुरचंद पार्कमधून राहुल गांधींनी लोकांना संबोधले. विदर्भाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी का झाली नाही? असा प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थित केला. महाराष्ट्राचा शेतकरी हा कर्जमाफी पासून का वंचीत राहिला असा प्रश्न त्यांनी केंद्राला केला आहे. महाराष्ट्र राज्याकडे पैसे आहे मात्र ते लोकांच्या कल्याणासाठी वापरले जात नसल्याचे गांधींनी सांगितले आहे.

काय म्हणाले राहुल गांधी

“मला तुमच्याबरोबर दीर्घकाळ नाते टीकवायचे आहे यासाठी मी तुमच्याशी खोटे बोलणार नाही. नरेंद्र मोदी हे खोटे बोलतात. देशातील प्रत्येकाला कमीत कमी १२ हजार उत्पन्न मिळावे यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. आम्ही सत्तेत आल्यावर १० दिवसांनतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील. महाराष्ट्र राज्याकडे पैसे आहेत. मात्र है पैसे शेतकऱ्यांसाठी वापरले जात नाहीत.” – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

First Published on: April 4, 2019 7:02 PM
Exit mobile version