‘तू इधर उधर की न बात कर’; राहुल गांधींचा मोदींवर अप्रत्यक्ष टोला

‘तू इधर उधर की न बात कर’; राहुल गांधींचा मोदींवर अप्रत्यक्ष टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अनलॉक – २ च्या निमित्ताने देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. अनलॉक १ पासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला. सार्वजनिक ठिकाणी नियमांचं पालन होताना दिसत नसल्याची खंतही मोदींनी व्यक्त केली. मात्र, भारत-चीन वादावर पंतप्रधान काहीच बोलले नाहीत. यावरुन काँग्रेसने मोंदींना लक्ष्य केलं आहे. तसंच राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे मोदींना टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक जुना शेर ट्विट करत मोदींना टोला लगावला आहे. “तू इधर उधर की न बात कर, ये बता कि क़ाफ़िला कैसे लुटा, मुझे रहज़नों से गिला तो है, पर तेरी रहबरी का सवाल है।” असा शेर राहुल गांधींनी ट्विट केला आहे.

चीनचं नाव घ्यायला मोदी घाबरतात – काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील जनतेला संबोधित केले. आपल्या संबोधनात, त्यांनी कोरोना विषाणू आणि लॉकडाऊन सुटवर तपशीलवार भाषण केले. पंतप्रधान मोदींच्या अभिभाषणात भारत-चीन तणावावर काही चर्चा होईल अशी अटकळ वर्तवली जात होती, पण तसं झालं नाही. चीनचा उल्लेख न केल्या बद्दल काँग्रेसने पंतप्रधानांवर निशाणा साधला आणि म्हटलं की चीनवर टीका करणाऱ्या गोष्ट विसरा, त्यांना आपल्या राष्ट्रीय भाषणात याचा उल्लेख करण्यास भीती वाटते.

कॉंग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर चीनविषयी एक फोटो शेअर केला आहे. चीनने ४२३ मीटरपर्यंतच्या भारताच्या सीमेवर घुसखोरी केली आहे. कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार २५ जूनपर्यंत चीनच्या सीमेवर १६ तंबू आणि टर्पॉलिन आहेत. चीनने मोठं बांधकाम केलं आहे, तसंच जवळपास १४ वाहने आहेत. पंतप्रधान ते नाकारू शकतात का, असा सवाल काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने असंही म्हटलं आहे की, भारताला अपयश स्विकारुन त्यात सुधारणा करण्याची इच्छा असणाऱ्या नेत्याची गरज आहे. संकटांकडे दुर्लक्ष करुन त्यावर बोलण्याचं टाळणाऱ्या नेत्याची गरज नाही आहे.


हेही वाचा – पवारांच्या ‘त्या’ विधानावरुन नितीन राऊतांचा पलटवार


 

 

First Published on: June 30, 2020 8:05 PM
Exit mobile version