भारताचे मूळ विचार नष्ट करण्याचं काम मोदींकडून..; राहुल गांधींचा हल्लाबोल

भारताचे मूळ विचार नष्ट करण्याचं काम मोदींकडून..; राहुल गांधींचा हल्लाबोल

केंब्रिज विद्यापीठात काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी चीनचं कौतुक करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भारतात लोकशाही संकटात आहे. पेगासस प्रकरणात माझाही फोन रडारवर होता. मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, फोनवर बोलताना सावधगिरी बाळगा कारण तुमचा फोन टॅप होत आहे. त्यामुळे भारतात एक प्रकारे दबावाचं वातावरण आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर केसेस टाकल्या जात आहेत. भारताचे मूळ विचार नष्ट करण्याचं काम हे मोदींकडून केलं जातंय, असं म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

चीनची रणनिती काय आहे यावर मोदींनी भाष्य केलं. चीनमध्ये आपल्याला ज्या प्रकारच्या पायाभूत सोयी आणि सुविधा दिसतात त्या उत्तम आहेत. रेल्वे, विमानतळ हे सगळं चीनने निसर्गाशी जोडलं आहे. चीन निसर्गासह उत्तम प्रकारे जोडला गेला आहे. अमेरिकेबाबत विचार केला तर, अमेरिकेला वाटतं की आपण निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहोत. मात्र चीन हा शांतता प्रिय देश आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

एखाद्या कॉरपोरेशनप्रमाणे चीन सरकार त्यांची कामं पूर्ण करतं. त्यामुळेच प्रत्येक माहितीवर सरकारची पूर्ण पकड असते. चीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीतही खूप पुढे गेला आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.


हेही वाचा : कसब्याच्या निकालानंतर शरद पवारांची भाजपावर तोफ; म्हणाले, देशात बदलाचे वारे


 

First Published on: March 4, 2023 11:38 AM
Exit mobile version