राहुल गांधींचा मोदींवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, ‘महंगाई का विकास जारी, अच्छे दिन देश पे भारी’

राहुल गांधींचा मोदींवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, ‘महंगाई का विकास जारी, अच्छे दिन देश पे भारी’

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आता सीएनजी (compressed natural gas) आणि पीएनजीचे (piped natural gas) दर वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोरोना काळात तेलाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हणाले की, ‘महंगाई का विकास जारी, अच्छे दिन देश पे भारी, पीएम की बस मित्रों को जवाबदारी’

माहितीनुसार आयजीएलने सीएनजीच्या किंमतीत ९० पैसे प्रति किलो आणि पीएनजीच्या किंमत दिल्लीमध्ये १.२५ रुपये प्रति एससीएम वाढवली आहे.

८ जुलैपासून CNG आणि PNGची नवीन किंमत

CNG

दिल्ली – ४४.३० रुपये प्रति किलोग्रॅम
नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद – ४९.९८ रुपये प्रति किलोग्रॅम
मुजफ्फरनगर आणि शामली – ५७.२५ रुपये प्रति किलोग्रॅम
गुरुग्राम – ५३.४० रुपये प्रति किलोग्रॅम
रेवाडी – ५४.१० रुपये प्रति किलोग्रॅम
करनाल – ५१.३८ रुपये प्रति किलोग्रॅम
कैथल – ५१.३८ रुपये प्रति किलोग्रॅम
कानपूर,हमीरपूर आणि फतेहपूर – ६०.५० रुपये प्रति किलोग्रॅम

PNG

दिल्ली – २९.६६ रुपये प्रति एससीएम
नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद – २९.६१ रुपये प्रति एससीएम
करनाल आणि रेवाडी – २८.४६ रुपये प्रति एससीएम
मुजफ्परनगर, मेरठ आणि शामली – ३२.६७ रुपये प्रति एससीएम


हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक; देशातील ऑक्सिजन साठ्याचा आढावा घेणार


 

First Published on: July 9, 2021 12:49 PM
Exit mobile version