देश का चौकीदार चोर है : राहुल गांधी

देश का चौकीदार चोर है : राहुल गांधी

राफेल विमान घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. ‘देश का चौकीदारही चोर है’ असं म्हणत राहुल यांनी मोदींवर जबरदस्त निशाणा साधला. ‘मोदीजी राफेल घोटाळा मान्य करा. तुम्ही देशासोबत गद्दारी केली आहे’, अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी मोदी यांच्यावर केली आहे. ‘देशासाठी रक्त सांडणाऱ्या शहीदांचा तुम्ही अपमान केलाय’ असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले. याशिवाय ट्वीटरच्या माध्यमातूनही राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ‘पंतप्रधान मोदी आणि अनिल अंबांनी यांनी एकत्र येत देशाच्या सैन्यदलावर १३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक केला’ असल्याची टीका राहुल यांनी ट्वीटरवरुन केली आहे.

राफेल विमान खरेदी घोटाळा हा देशातील सर्वात मोठा असल्याचा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्यापाठोपाठ आता फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रँकोइस होलँद यांनी नुकतंच राफेल घोटाळ्याप्रकरणी एक मोठं वक्तव्य केलं आहे. फ्रँकोइस होलँद यांच्या म्हणण्यानुसार,”राफेल खरेदी व्यवहार उद्योगपती अनिल अंबानी यांच्यामार्फत करावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. राफेल व्यवहारामुळे अनिल अंबानींच्या कंपनीला ४१ हजार कोटी रुपयांचा फायदा झाल आहे. दरम्यान याप्रकरणी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा”. दरम्यान राफेल विमान घोटाळ्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस येत्या २७ सप्टेंबरला मुंबईत मोर्चा काढणार आहे.


सविस्तर वृत्त: ‘राफेल’ विरोधात मुंबईत काँग्रेसचा मोर्चा

 

First Published on: September 22, 2018 4:17 PM
Exit mobile version