आयडीया ऑफ इंडिया ; सावरकरांचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

आयडीया ऑफ इंडिया ; सावरकरांचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला करत आहेत. यामुळे त्यांच्यावर टीका करत असतो असे काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आयडीया ऑफ इंडियाचा उल्लेख करत राहुल गांधींनी सावकरांच्या विचारांवरुन मोदींवर हल्लाबोल केला आहे. नुकतेच काँग्रेसमध्ये जिग्नेश पटेल आणि कन्हैया कुमारने प्रवेश केला असून भाजपवर हल्लाबोल केला आहे. कन्हैया कुमारच्या सूरात सूर मिसळून राहुल गांधींनीही मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी सावरकरांच्या विचारांचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मोदी देशातील सर्व धर्मीयांमधील नातं तोडण्याचे काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी केरळ दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, जर तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचला तर तुम्हाला भारत हा भुगोल दिसेल. याचे कारण ते पेनाने नकाशा काढतात आणि सांगतात की हा भारत आहे. ज्या रेषा रेखाटल्या आहेत त्या रेषेच्या आतील भाग हा भारत असल्याचे ते सांगतात तर रेषेबाहेरील भाग हा भारताचा नाही असे सांगतील, असं राहुल गांधी यांनी कार्यक्रमात म्हटलं आहे.

दरम्यान पुढे राहुल गांधींनी म्हटलं आहे की, भारत हा प्रदेश असून इथे विविध लोकांचे नातं आहे. हिंदू-मुस्लीमांचे नात आहे. हिंदू-मुस्लीम-शीख धर्मीयांचे नाते आहे. हिंदी-तमिळ, तेलुगू, उर्दू, बंगाली यांच नातं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यातील हे नातं तोडण्याचे काम करत आहेत. भारताच्या सार्वभौमत्वावर मोदी हल्ला करत असल्यामुळे लोकांच्या नात्यांमध्ये जवळीक आणणं माजी जबाबदारी असल्यामुळे मी त्यांना विरोध करत असतो असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Coronavirus Update in India: आगामी सण-उत्सव काळजीपूर्वक साजरे करा – नीती आयोग


 

First Published on: September 29, 2021 6:51 PM
Exit mobile version