घरताज्या घडामोडीCoronavirus Update in India: आगामी सण-उत्सव काळजीपूर्वक साजरे करा - नीती आयोग

Coronavirus Update in India: आगामी सण-उत्सव काळजीपूर्वक साजरे करा – नीती आयोग

Subscribe

देशात आता कोरोनाबाधितांच्या केसेस सतत कमी होताना दिसत आहे. तरी देखील सरकारने कोरोना निर्बंधात कोणतीही शिथिलता दिली नाही आहे. केंद्र सरकारने राष्ट्रव्यापी कोरोना निर्बंध ३१ ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवले आहेत. आगामी सण-उत्सवात कोरोना निर्बंधांचे पालन न केल्यास पुन्हा कोरोनाच्या केसेस वाढू शकतात, असा इशारा केंद्रीय गृह सचिवने दिला आहे. तसेच आता नीती आयोग्य आरोग्य विभागाचे सदस्य वीके पॉल म्हणाले की, आगामी सण-उत्सव काळजीपूर्वक साजरे करा. कोरोनाच्या विरोधातील लढाईत यावर्षीचा सुरक्षित उत्सव हा निर्णायक ठरेल.

- Advertisement -

देशात कोरोना केसेसमध्ये कमी होत असली तरी मार्गदर्शक सूचना लागू राहणे महत्त्वाचे आहे. कारण सण-उत्सव काळजीपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने केले जाऊ शकतात, असे केंद्राचे मत आहे. एकाबाजूला कोरोना केसेसमध्ये घट होत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. तर आता दुसरीकडे लवकरच लहान मुलांना लस मिळण्याची आशा आहे. सध्या भारतात पुन्हा शाळा सुरू होत असल्यामुळे लस निर्मात्या कंपन्या लहान मुलांची लस तयार करण्याचे काम करत आहे.

दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ७ ते ११ वयोगटातील मुलांसाठी अमेरिकन कंपनीची नोवावॅक्स डोसची चाचणी करत आहे. कंपनीने भारतात या लसीचे नाव कोवोवॅक्स ठेवले आहे. भारतीय औषध नियामकने सीरम इन्स्टिट्यूला अमेरिकन कंपनी नोवावॅक्स लसीचे ७ ते ११ वयोगटातील मुलांवर चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान भारतात कोवोवॅक्स लसीला आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली नाही आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लसीं अभावी कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात ; संसर्ग रोखण्यासाठी लस उत्पादकांना परवानगी मिळण्याची शक्यता


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -