Congress Rally in Jaipur: मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही, हिंदुत्ववादी सत्तेसाठी भुकेले, राहुल गांधींचा घणाघात

Congress Rally in Jaipur: मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही, हिंदुत्ववादी सत्तेसाठी भुकेले, राहुल गांधींचा घणाघात

देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस पक्ष जयपूरमध्ये ‘महंगाई हटाओ’ महारॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. या रॅलीला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. जयपूरच्या विद्यानगर स्टेडियममध्ये ही रॅली सुरू आहे. या रॅलीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यावेळी उपस्थित होत्या. दरम्यान, देशात २०१४ पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे. हिंदूंची सत्ता नाही. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून बाहेर काढून देशात पुन्हा एकदा हिंदुंची सत्ता आणा. असं आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.

हिंदुत्ववाद्यांना हटवून हिंदूंना सत्तेत आणायचे आहे

काँग्रेसने महारॅलीचे आयोजन केले आहे. राहुल गांधी जयपूर येथे बोलत होते. २०१४ मध्ये हिंदुत्वावादी सत्तेत आले. पण हिंदू आजही सत्तेपासून दूर आहेत. आपल्याला या हिंदुत्ववाद्यांना हटवून हिंदूंना सत्तेत आणायचे आहे. तुम्ही सर्वजण हिंदू आहात. हिंदुत्ववादी सत्तेचे भुकेलेले आहेत. हिंदुत्त्ववाद्यांचा सत्याच्या मार्गाशी काहीही संबंध नाही. हिंदू सत्याच्या शोधात कधीच झुकत नाही. परंतु हिंदुत्ववादी द्वेषाने पछाडलेले आहे. असं राहुल गांधी म्हणाले.

मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही

जो हिंदुत्ववादी असतो तो कोणत्याच धर्माला जुमानत नाही. तो फक्त हिंसेवर विश्वास ठेवतो. हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन शब्दांची आत्मा एक सारखी असूच शकत नाही. मी हिंदू आहे आणि अहिंसेवर विश्वास ठेवतो. महात्मा गांधी हिंदू होते आणि गोडसे हिंदुत्ववादी होते. केंद्र सरकार हिंदुत्ववादी आहे. ज्यांचे काम फक्त ऐकमेकांना मारणे आहे. सत्तेसाठी हे लोकं काहीही करू शकतात. असं राहुल गांधी म्हणाले.

एलपीजी सिलेंडर आणि तेलाच्या किंमतीत वाढ

एलपीजी सिलिंडरची किंमत सुमारे १ हजार रुपये आहे, मोहरीच्या तेलाची किंमत २०० रुपये प्रति लीटर आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. असे प्रियांका गांधी म्हणाल्या. सामान्य जनतेचा आवाज कोणाही ऐकत नाहीये. महागाई विरोधात प्रियांका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकार जनतेसाठी काम करत नसून केवळ निवडक उद्योगपतींसाठी काम करत आहे. केंद्र सरकार हे लबाड आणि लुटमारीचे सरकार आहे. पीएम मोदी पर्यटनात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांकडे जाण्यासाठी वेळ मिळत नाहीये.

दरम्यान, महारॅलीच्या माध्यमातून केंद्राला घेराव घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील तेल, गॅस आणि खाद्यपदार्थांच्या किमतींविरोधात काँग्रेस आंदोलन करत आहे. सचिन पायलट यांनी देखील पुढाकार घेतला आहे.

First Published on: December 12, 2021 4:18 PM
Exit mobile version