CoronaVirus: महिलांनी प्लास्टिकच्या पिशवीत थुंकून, पिशव्या भिरकावल्या इतरांच्या घरात!

CoronaVirus: महिलांनी प्लास्टिकच्या पिशवीत थुंकून, पिशव्या भिरकावल्या इतरांच्या घरात!

CoronaVirus: महिलांनी प्लास्टिकच्या पिशवीत थुंकून, पिशव्या भिरकावल्या इतरांच्या घरात!

सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत राजस्थानच्या कोटामधील एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. कोटामधील काही महिला प्लास्टिकच्या पिशवीत थुंकून काही घरात फेकत आहेत. या किळसवाण्या प्रकाराची छायाचित्र सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. कोटाच्या वल्लभवाडी परिसरात अशा प्रकारच्या घटना घडत आहे. मात्र आता अशा घटनामुळे परिसरात भीती पसरली आहे. सध्या परिस्थितीत कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर कारवाई केली जात आहे. अशा परिस्थिती या महिलांनी केलेले कृत्यावर प्रश्न निर्माण होत आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस सतर्क झाले आहेत.

गुमनपुरा सर्कल पोलीस अधिकारी मनोज सिकरवाल म्हणाले की, या भागात निर्जंतुकीकरण करण्यात आले असून या आरोपी महिलांचा शोध घेतला जात आहे.

आतापर्यंत राजस्थानमध्ये ८४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच १२१ कोरोनाचे रुग्ण रिकव्हर झाले आहेत. जगातील संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे. जगात आतापर्यंत १८ लाखा हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तसंच १ लाखांहून अधिक जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ९ हजारहून अधिक झाली आहे. त्यापैकी ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – CoronaVirus: नवजात बालकाचे नाव ठेवले सॅनिटायझर!


 

First Published on: April 13, 2020 7:34 PM
Exit mobile version