पायलट भाजपच्या षडयंत्रात सामील; काँग्रेसचा गंभीर आरोप

पायलट भाजपच्या षडयंत्रात सामील; काँग्रेसचा गंभीर आरोप

नाराज सचिन पायलट यांना प्रियांका गांधी यांनी रात्री उशिरा फोन केला.

राजस्थानमधील सत्तासंघर्षात सचिन पायलट यांना फटका बसला आहे. बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून अखेर कारवाई करण्यात आली. पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरुन तसंच प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. या सगळ्या घडामोडीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या सरकार पाडण्याच्या षडयंत्रात पायलट सहभागी होते असा आरोप गेहलोत यांनी केला आहे.

सचिन पायलट यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत गंभार आरोप केले. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली गेहलोत यांनी दिली. “घोडेबाजार सुरु असल्याची आम्हाला कल्पना होती. अखेर हाय कमांडने निर्णय घेतला आहे. भाजप देशभरात घोडेबाजार करत असून मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये करण्यात आला आहे,” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सचिन पायलट देखील षडयंत्रात सहभागी होते असा आरोप केला.


हेही वाचा – पायलट यांना उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं


 

First Published on: July 14, 2020 4:36 PM
Exit mobile version