घरताज्या घडामोडीपायलट यांना उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं

पायलट यांना उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं

Subscribe

राजस्थान काँग्रेसमध्ये बंडाचं निशान हाती घेतलेल्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई केली केली आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्यात आलं आहे. शिवाय त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन देखील हटवण्यात आलं आहे. सचिन पायलट यांच्यासह तीन जणांवर कारवाई केली आहे. गोविंद सिंह डोटासरा यांना राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्षपमदी नेमण्यात आलं आहे.

- Advertisement -

विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी याची घोषणा केली. सचिन पायलट यांच्यासह विश्वेंद्र सिंग आणि रमेश मीना यांनादेखील मंत्रिमंडळातून काढून टाकलं आहे. जयपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक संपल्यानंतर सुरजेवाला म्हणाले, “उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि काही आमदार आणि मंत्री गोंधळून कॉंग्रेसचे सरकार पाडण्याच्या भाजपच्या कटात सामील झाल्याबद्दल आम्हाला खेद वाटतो.” पायलटविरूद्ध केलेल्या कारवाईची माहिती देताना सुरजेवाला यांनीही लहान वयातच सचिन पायलट यांना पक्षाने बरंच काही दिल्याचं म्हटलं.

सुरजेवाला पुढे म्हणाले, “राहुल गांधींच्या नेतृत्वात सोनिया गांधी जी सतत सचिन पायलट आणि अन्य सहकारी मंत्री, आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहिले. कॉंग्रेस हाय कमांडने सचिन पायलट यांच्याशी सहा वेळा चर्चा केली. सीडब्ल्यूसीच्या दोन सदस्यांनी पायलटशी १२ वेळा चर्चा केली. केसी वेणुगोपाल अनेक वेळा बोलले. सोनियाजी आणि राहुल जी यांच्या वतीने आम्ही सर्व दरवाजे खुला असल्याचं आवाहनही केलं. जर आपल्यात मतभेद असतील तर कॉंग्रेस नेतृत्वाला सांगा, आम्ही खाली बसून सोडवू.

- Advertisement -

हेही वाचा – सचिन पायलट भाजपच्या संपर्कात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -