राज्यसभा निवडणूक निकाल : कोणत्या पक्षाला किती जागा, जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यसभा निवडणूक निकाल : कोणत्या पक्षाला किती जागा, जाणून घ्या एका क्लिकवर

नवी दिल्ली : महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि हरियाणा या चार राज्यांतील राज्यसभेच्या 16 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. मतमोजणीनंतर राजस्थानमध्ये काँग्रेसला तीन आणि भाजपला एक जागा मिळाली. कर्नाटकात अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि काँग्रेसचे जयराम रमेश यांना विजयी घोषित करण्यात आले. राजस्थानमध्ये क्रॉस व्होटिंगमुळे भाजपने आपल्या आमदार शोभरानी कुशवाह यांना निलंबित केले. महाराष्ट्रात भाजपने तीन जागा जिंकल्या तर शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला.

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सात जागांसाठी झालेल्या राज्यसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी पहाटे जाहीर झाले. महाराष्ट्रातील तीन जागा भाजपच्या वाट्याला गेल्या, एक शिवसेना, एक काँग्रेस आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसनं जागा मिळवली. भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले. याशिवाय शिवसेनेचे संजय राऊत यांनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेलही विजयी झालेत. पराभवात शिवसेनेचे संजय पवार यांचे नाव आहे.

राजस्थान

राजस्थानमधील राज्यसभेच्या चार जागांचे निकाल शुक्रवारी सायंकाळी उशिरा जाहीर झाले. येथे एकूण चार जागांपैकी तीन जागा काँग्रेसच्या खात्यात गेल्या, तर एक जागा भाजपच्या खात्यात आली. काँग्रेसकडून राज्यसभेचे उमेदवार रणदीप सुरजेवाला, प्रमोद तिवारी आणि मुकुल वासनिक विजयी झालेत. भाजपचे घनश्याम तिवारी विजयी झाले. तर अपक्ष उमेदवार सुभाष चंद्र यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

कर्नाटक

कर्नाटकातील चार जागांचे निकाल शुक्रवारी सायंकाळी उशिरा जाहीर झाले. येथे एकूण चार जागांपैकी तीन जागा भाजपच्या खात्यात गेल्या, तर एक जागा काँग्रेसच्या खात्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, जगेश, लहरसिंग सिरोया यांनी भाजपकडून निवडणूक जिंकली. काँग्रेसचे जयराम रमेश यांना विजय मिळाला. दुसरीकडे डी कुपेंद्र रेड्डी (जेडी-एस) आणि काँग्रेसचे मन्सूर अली खान हे पराभूत झालेल्यांमध्ये आहेत.

हरियाणा

हरियाणातील दोन जागांचे निकाल शुक्रवारी संध्याकाळी जाहीर झाले. येथे तीन उमेदवार रिंगणात होते. भाजपचा एक, काँग्रेसचा एक आणि एक अपक्ष उमेदवार आहे. यातील विजेत्यांमध्ये भाजपचे कृष्ण लाल पनवार (भाजप) आणि कार्तिकेय शर्मा यांची नावे आहेत, ज्यांना भाजप आणि जेजेपीचा पाठिंबा आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे अजय माकन यांचा पराभव झाला आहे.


हेही वाचाः भाजपच्या विजयाने काही लोक बावचळले, पिसाटलेत; फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

First Published on: June 11, 2022 4:13 PM
Exit mobile version